सुजित झावरे पाटील आक्रमक; पारनेरमधील वीज खंडितप्रकरणी अधिकाऱ्यांना धारेवर

सुजित झावरे पाटील आक्रमक; पारनेरमधील वीज खंडितप्रकरणी अधिकाऱ्यांना धारेवर

पारनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी ६ ते १० या वेळेत सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. या वारंवार होणाऱ्या खंडित पुरवठ्यामुळे घरगुती तसेच व्यावसायिक कामकाज ठप्प होत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या गंभीर प्रश्नावर सुजित झावरे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत थेट नगर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडक देत कार्यकारी अभियंता श्री. योगेश चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या तीव्र भावना अधिकाऱ्यांसमोर मांडत वारंवार होणाऱ्या वीज खंडितप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली.

तसेच, तातडीने ठोस उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला. यावर कार्यकारी अभियंता श्री. योगेश चव्हाण यांनी परिस्थितीची दखल घेत आज किंवा उद्यापासून वीज पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करून समस्या कमी करण्याचे आश्वासन घेऊनच सुजित झावरे पाटील कार्यालयातून बाहेर पडले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles