छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 25 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत निवडून आलेल्या २५ नगरसेवकांवर तीन अपत्ये, अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण, अतिक्रमण हटाव कारवाईस विरोध आदी कारणांमुळे तक्रारी दाखल झाल्या आहेत. ज्या नगरसेवकांच्या विरोधात तक्रारी प्राप्त आहेत, त्यांची सुनावणी मनपा आयुक्त अमोल येडगे घेत आहेत. आज दुपारी सुनावणी असून, ९ नगरसेवकांना नोटीस बजावून सुनावणीला हजर राहण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. आतापर्यंत १७ आणि २४ ऑगस्टला प्रत्येकी ९ नगरसेवकांच्या तक्रारींवर सुनावणी झाली.

महापालिकेतील 25 नगरसेवकांविरोधात दाखल झालेल्या 37 तक्रारींपैकी सर्वाधिक तक्रारी एमआयएमच्या नगरसेवकांविरोधात आहेत. एमआयएमच्या 18, भाजपच्या 6 आणि शिंदेसेनेच्या एका नगरसेवकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ली आहे. आतापर्यंत १७ आणि २४ ऑगस्टला प्रत्येकी ९ नगरसेवकांच्या तक्रारींवर सुनावणी झाली. आतापर्यंत झालेल्या दोन्ही सुनावण्यांमध्ये नगरसेवकांनी तक्रारी आणि त्यासोबत सादर करण्यात आलेल्या पुराव्यांचा अभ्यास करण्यासाठी वेळ मागितला. त्यानुसार आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित नगरसेवकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ दिला आहे. आजच्या सुनावणीतही संबंधित नगरसेवकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान यापूर्वी झालेल्या प्रकरणांमध्ये पुढील सुनावणीची तारीख आयुक्तांकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. आता या तक्रारीवर आयुक्त अमोल येडगे काय निर्णय घेतात, याकडे छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles