चक्क १२ कोटींच्या Rolls-Royce लक्झरी कारमधून चहा विक्री… व्हिडिओ तुफान व्हायरल

भारतात चहा हे सर्वात लोकप्रिय पेय आहे. चहाला वेळ नसते पण वेळेला चहाच हवा असे म्हटले जाते. चहाच्या टपऱ्या जागोजागी दिसतात. पण एका तरुणाने अजब शक्कल लढवत ग्राहकांना चक्क कोट्यवधींच्या आलिशान कारमध्ये बसवून चहाचा आस्वाद दिला.

एक चहावाला टपरीवर जितकी कमाई करतो, तितका पगार एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यालाही मिळत नाही. चहावाले स्वतःच्या फ्रेंचायझी विकताना दिसत आहेत. असो, पण एका तरुणानं या चहाच्या बिझनेसला एक पायरी आणखी वर नेली आहे. हा तरुण चक्क १२ कोटींच्या Rolls-Royce लक्झरी कारमधून चहा विकतोय. विश्वास बसत नसेल तर हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहाच.

व्हिडिओ deluxebhaiyaji या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही एका तरुणाला पाहू शकता. त्यानं १ लाख रुपये खर्च करून एक दिवसासाठी भाड्याने Rolls-Royce कार घेतली आणि त्यातून चक्क चहा विकला. चहासोबत त्यानं ग्राहकांना लक्झरी कारमध्ये बसण्याचा अनुभवही दिला. या अनोख्या कल्पनेतून त्यानं दिवसभरात ८८ हजार ४०० रुपयांची कमाई केली. प्रत्यक्षात या बिझनेसमध्ये त्याला जवळपास १२ हजार रुपयांचा तोटा झाला, पण ग्राहकांना एक युनिक अनुभव दिल्याचा आनंद त्यानं व्यक्त केला.

भारतामध्ये एका Rolls-Royce कारची किंमत ही जवळपास ७ कोटी ते १२ कोटींच्या आसपास आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles