अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू

अहिल्यानगर-जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून सभासद संस्थांच्या (सेवा सोसायट्यांच्या) प्रतिनिधींचे ठराव 17 जून ते 16 जुलै या कालावधीत मागवण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक संभाजी निकम व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नगर मंगेश सुरवसे यांनी दिली.

या निवडणुकीत मतदान करण्यासाठी ज्या सहकारी संस्था 1 जून 2023 किंवा त्यापूर्वी बँकेच्या सभासद असतील त्याच पात्र राहणार आहेत. प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था सोडून इतर सहकारी संस्था थकबाकीत असतील, तर अशा संस्था प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार राहणार नाही. तथापि, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था जर थकबाकीत असेल, तर अशा संस्थांच्या संचालकांच्याऐवजी सदर संस्थेच्या थकबाकीदार नसलेल्या एखाद्या सदस्याचा प्रतिनिधी म्हणून समावेश करण्यात करण्याचा ठराव घेता येईल. तसेच ज्या संस्थांच्या बाबतीत 73 क, अ (1), (ळ) फ अन्वये कार्यवाही केलेली असल्यास त्या संस्था मतदानासाठी पात्र राहणार नाहीत. बँक सभासद संस्थांचे प्रतिनिधींचे ठराव संस्थेचे मुख्यालय असलेल्या जिल्ह्यातील संबंधित उप / सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत दिनांक 17 जून ते 16 जुलै 2026 या कालावधीत कार्यालयीन वेळेत सादर करावयाचे आहेत.

सभासद संस्थेने याच कालावधीत प्रतिनिधींचे ठराव घेणे आवश्यक आहे. याबाबतचा सविस्तर तपशील सभासद सहकारी संस्थांना कळविला असल्याचे बँकेच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी एक महिना ठराव घेण्यासाठी त्यानंतर एक महिना मतदार यादी कार्यक्रम यासाठी आवश्यक राहणार आहे. त्यानंतर साधारण महिनाभरात निवडणूक कार्यक्रम जाहीर होवून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा बँकेसाठी ऑगस्ट अथवा सप्टेंबरमध्ये निवडणूका होण्याच्या शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या 21 संचालक मंडळाच्या जागा असून त्यात 14 जागा या सेवा सोसायट्यांसाठी आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील सहकारातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles