स्वर्गीय धीरज परदेशी यांच्या कुटुंबियांना मनपाने २५ लाखांची आर्थिक मदत करावी

स्वर्गीय धीरज परदेशी यांच्या कुटुंबियांना मनपाने २५ लाखांची आर्थिक मदत करावी

माजी उपमहापौर गणेश भोसले यांची महापौर ज्योतीताई गाडे व आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिका विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी स्वर्गीय धीरज कचरुसिंग परदेशी यांच्यावर मुकुंदनगर परिसरात कामावर असताना समाजकंटकांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धीरज परदेशी यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, घरातील कर्त्या युवकाचे निधन झाल्याने कुटुंबाचा प्रमुख आधारच हरपला आहे. त्यामुळे स्वर्गीय धीरज परदेशी यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेने तातडीने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी महापौर ज्योतीताई गाडे व मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदन सादर केले. स्वर्गीय धीरज परदेशी हे महानगरपालिकेच्या विद्युत विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. शहरातील नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देताना कर्तव्य बजावत असतानाच त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना केवळ आर्थिक मदत नव्हे, तर महानगरपालिकेने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे असल्याचे गणेश भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे.
घरातील कर्त्या व्यक्तीचे अचानक निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुटुंबाच्या भविष्यातील गरजा, शिक्षण, दैनंदिन खर्च तसेच इतर आर्थिक जबाबदाऱ्या लक्षात घेता महानगरपालिकेने तातडीने २५ लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महानगरपालिका कर्मचारी शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य यांसह विविध नागरी सुविधा देण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत काम करतात. कर्तव्य बजावत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे स्वर्गीय धीरज परदेशी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी गणेश भोसले यांनी केली.
याप्रकरणी महानगरपालिका प्रशासनाने संवेदनशील भूमिका घेत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि स्वर्गीय धीरज परदेशी यांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles