अहिल्यानगर शहरातील मतदारांची मतदार यादीतील विरोधी मतदारांची नावे गायब!

मतदार यादी विशेष पुनरावलोकन मोहिमेच्या माध्यमातून विरोधी मतदारांची नावे गायब करण्याचे षड्यंत्र – किरण काळे ;

महिला आरक्षणाच्या आडून देश तोडण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव फसला

प्रतिनिधी : सध्या महाराष्ट्रासह देशातील २२ राज्यांमध्ये मतदार यादी विशेष पुनरावलोकन मोहिम (एसआयआर) राबवली जात आहे. विरोधी मतदारांची नावे गायब करण्यासाठीचं हे सत्ताधाऱ्यांचं देश विरोधी षडयंत्र आहे. एसआयआर ही वोट चोरीची योजना आहे. निवडणूक आयोग आता वोट चोरी षडयंत्राचा सक्रिय भागीदार बनला असून हा लोकशाही वरील हल्ला असल्याचा गंभीर आरोप, ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केला आहे. आपली नावे गायब होणार नाहीत या साठी मॅपिंग करून घेत मतदारांनी जागरूक रहावे, असे आवाहन काळे यांनी केले आहे.

अहिल्यानगर शहरातील मतदारांची मतदार यादीतील नावे सुरक्षित व अबाधित राहण्यासाठी जनजागृती अभियान विरोधकांच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. त्याच्या शुभारंभ प्रसंगी काळे बोलत होते. यावेळी संजय झिंजे, मनोज गुंदेचा, विलास उबाळे, अनिस चुडीवाला, अनंत गारदे, रावजी नांगरे, पै. दीपक भोसले, सुशांत म्हस्के, प्रतीक बारसे, राम वाणी, राम झिने, प्रा. अमोल खाडे, रोहन शेलार, मतीन शेख, विकेश गुंदेचा, गणेश आपरे, शंकर आव्हाड, नलिनी गायकवाड, नीता बर्वे, अर्चना गायकवाड, शारदा वाघमारे, उषा भगत, शैला लांडे, रजनी ताठे, मीना रणशूर, रूपाली आपरे, लोकेश बर्वे, विजय शिरसाठ, चंद्रकांत उजागरे, जयराम आखाडे, विनोद शिरसाट, राम धोत्रे, सोनू देशमुख, आकाश अल्हाट, विकास भिंगारदिवे, निलेश लांडे, आप्पासाहेब लांडगे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किरण काळे म्हणाले, एसआयआर प्रक्रिया घाईघाईने आणि नियोजित रीतीने राबवली जात आहे, ज्यामुळे खऱ्या मतदारांचे, विशेषतः गरीब, दलित, ओबीसी, अल्पसंख्याक आणि स्थलांतरित नावे यादीतून काढली जात आहेत. जी मतं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पडतात ती हेरून वगळली जात आहेत. ही मत चोरीला झाकण्यासाठी योजना आहे. निवडणूक आयोग दबावाखाली काम करत आहे. ही मोहीम म्हणजे मतदार यादी स्वच्छ करण्याचे नाव आहे, पण प्रत्यक्षात खऱ्या मतदारांना वंचित ठेवण्याचे षडयंत्र आहे. आपली नावे मतदार यादीत अबाधित राहण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहावे. मॅपिंग करून घ्यावे. आपल्या केंद्राच्या बीएलओशी संपर्क साधावा. या प्रक्रियेत काही अडचणी आल्यास मतदारांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन काळे यांनी केले आहे.

देश तोडण्याचे षडयंत्र फसले :
अनेकांच्या बलिदानानंतर स्वातंत्र्य मिळाल. त्यानंतर संघराज्य पद्धतीने लोकशाही आधारित संसदीय प्रणाली देशाने स्वीकारली. मात्र महिला आरक्षणाचा बागुलबुवा उभा करून लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेच षडयंत्र आखलं होतं. मात्र देश तोडण्याचे हे षडयंत्र विरोधी पक्षांनी मोडून काढलं. महिला अत्याचाराच हथराव, उन्नाव प्रकरण, मणिपूर मध्ये महिलांची नग्न धिंड, महिला खेळाडूंवर अत्याचार होत असताना नारी शक्तीचा ढोंगी दिंडोरा वाजवणारे मूग गिळून गप्प का होते ? घरगुती गॅस तूटवड्या मुळे आजही अनेक माता भगिनी मोठ्या त्रासाचा सामना करत आहेत. लाडक्या बहीण योजनेची मदत वारंवार वेळेत मिळत नाही. योजना बंद पडायच्या मार्गावर आहे. मात्र मनुवादाचे पुरस्कर्ते असणारे महिला विरोधी सरकारचे षडयंत्र विरोधी पक्षांच्या एकजुटी मुळे फसले असल्याचे प्रतिपादन, किरण काळे यांनी यावेळी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles