१५ मार्च २०२४ च्या संचमान्यता शासन निर्णयातील जाचक अटी रद्द करणार – शिक्षणमंत्री दादा भुसे यांची ग्वाही.
दोन दिवसात मुंबई येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक
अहिल्यानगर : शासननिर्णय १५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेच्या निर्णयातील शिक्षक अहिताच्या व जाचक अटी रद्द व्हाव्यात याकरिता महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. ना.दादा भुसे यांची छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष केशव जाधव व राज्य कार्याध्यक्ष देविदास बस्वदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने समक्ष भेट घेऊन यशस्वी चर्चा केली.
१५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाविरोधात काही संघटना न्यायालयात गेल्या होत्या. परंतु न्यायालयाने शासनाच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही या कारणास्तव १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय आहे तसा अधिकृत केला. त्यामुळे संपूर्ण शिक्षक वर्गात अस्वस्थता निर्माण झालेली आहे. हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षण मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली.जाचक अटी रद्द करण्याबाबत आग्रही मागणी केली. याबाबत शालेय शिक्षण मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.पुढील दोन दिवसात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर मुंबई येथे बैठक घेऊन शिक्षकांना अडचणीत आणणाऱ्या सर्व अटी रद्द करण्यात येतील ,अशी ग्वाही दिली. शिक्षण मंत्री महोदयांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे शिक्षकांना दिलासा मिळणार असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्तसचिव राजेंद्र निमसे यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना राज्याध्यक्ष केशव जाधव,राज्य सरचिटणीस राजेश सुर्वे, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा अखिल महाराष्ट्र प्राथ शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे, अहिल्यानगर जिल्ह्याचे शिक्षक नेते बापूसाहेब तांबे,हनुमंतराव शिंदे, एकल शिक्षक सेवा मंचाचे विकास खांडेकर यावेळी उपस्थित होते.
या निर्णयाचे स्वागत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे ,राज्य संयुक्तसचिव राजेंद्र निमसे, राज्यसंघटक बाळासाहेब कदम, जिल्हाध्यक्ष शरद वांढेकर, सुनील शिंदे ,प्रदिप चक्रनारायण, सुरेश नवले, रामप्रसाद आव्हाड, शिवाजी ढाकणे, सुधीर बो-हाडे,विष्णू बांगर,संजय शेळके,संदीप भालेराव,रज्जाक सय्यद,सुधीर रणदिवे,मधुकर डहाळे,विलास लवांडे,महेश लोखंडे,ज्ञानदेव कराड,प्रकाश पटेकर,लाजरस कसोटे,भाऊसाहेब घोरपडे, नितीन थोरात,बजरंग बांदल , संगीता निमसे,मनिषा क्षेत्रे, संगीता निगळे,पांडुरंग देवकर ,संतोष ठाणगे , रवींद्र अनाप ,जनार्दन काळे , ज्ञानदेव , कराड,सुनिल कदम,प्रताप कदम , बथूवेल हिवाळे ,उद्धव डमाळे ,नंदू गायकवाड , शिवाजी माने ,सुखदेव डेंगळे बंडू नागरगोजे , लक्ष्मण जटाडे , बबन देशमुख ,राजेंद्र सोनवणे , शहाजी जरे, प्रदीप कांबळे , विनायक गोरे , अशोक दहिफळे ,प्रविण शेळके,रविंद्र दरेकर,संजय कांबळे ,भारत शिरसाट,संदिप काळे, संजय थोरात,भाऊसाहेब घोरपडे , सर्जेराव ससाणे आदींनी केले आहे.


