अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात 15 अधिकार्‍यांच्या बदल्या ; एसपी मुम्मका सुदर्शन यांचे आदेश

अहिल्यानगर -जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 12 पोलीस उपनिरीक्षक अशा एकूण 15 पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी (10 जुलै) रात्री उशिरा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी याबाबतचे आदेश जारी केले. बदली झालेल्या सर्व अधिकार्‍यांनी कोणताही पदग्रहण अवधी न घेता तात्काळ नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रूजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आदेशानुसार, पोलीस निरीक्षक नितीन कंडारे यांची नियंत्रण कक्षातून जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. नुकतीच राहुरी पोलीस ठाण्यात बदली झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांची पुन्हा बदली करण्यात आली असून, त्यांच्याकडे अप्पर पोलीस अधीक्षक यांचे वाचक म्हणून पदभार सोपविण्यात आला आहे. तसेच, तोफखाना पोलीस ठाण्यातून यापूर्वी पाथर्डी येथे बदली झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला यांची राहुरी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. बदली झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांची नियुक्ती पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे.

गजेंद्र इंगळे (अहिल्यानगर तालुका), अजय कौटे (एमआयडीसी), समाधान फडोळे (अकोले), संदीप शिंदे (नेवासा), रसुल शेख (श्रीगोंदा), आजिनाथ बटुळे (कर्जत), परसराम तागड (राजूर), हर्षवर्धन बहिर (श्रीरामपूर शहर), किरण जगदाळे (मिरजगाव), विजयकुमार कोठावळे (बेलवंडी), किरण शेलार (वाहतूक शाखा, शिर्डी) आणि अशोक खेडकर (खर्डा). दरम्यान, बदली झालेल्या सर्व अधिकार्‍यांनी पदग्रहण अवधीचा लाभ न घेता तात्काळ बदलीच्या ठिकाणी हजर व्हावे, तसेच संबंधित प्रभारी अधिकार्‍यांनी त्यांचा कार्यभार स्वीकारल्याबाबतचा अनुपालन अहवाल विनाविलंब पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर करावा, असे स्पष्ट निर्देश अधीक्षक सुदर्शन यांनी आदेशात दिले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles