तुकाराम मुंढेंसह 6 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुंढें आता अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्त

आपल्या कामाच्या धडाडीमुळे सातत्याने चर्चेत असलेले आणि सातत्याने बदलीचा त्रास सहन करणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. लाचखोरी आणि इतर भ्रष्ट कामांमुळे चर्चेत असलेल्या अन्न आणि औषध प्रशासनात आता आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आली आहे. तसा आदेश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे.

दीडच महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली करण्यात आली होती. आता पुन्हा त्यांची अन्न आणि औषध प्रशासन खात्यात आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याचं अन्न आणि औषध प्रशासन खातं सातत्याने चर्चेत आहे. या विभागातल्या अधिकाऱ्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होताना दिसतात. राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ हे या खात्याचे मंत्री आहेत. काही दिवसांपूर्वी या विभागातील अधिकाऱ्याने मंत्रायलातच लाच घेतल्याचा प्रकार घडला होता. लाचलुचपत विभागाने मंत्रालयातच त्याला अटक करत कारवाई केली होती.
संजय खंदारे – वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालयातील मुंबई विभागातील सचिव, अन्न व औषध प्रशासन विषयाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत त्यांच्याकडे सोपवण्यात आलाय. धीरज कुमार यांच्याकडून हा कार्यभार स्वीकारावा लागणार आहे.

तुकाराम मुंढे यांची मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती श्रीधर डुबे यांच्या जागी झाली.

कान्हुराज बगाटे यांची नियुक्ती महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना रुबल प्रखेर-अगरवाल यांच्याकडून कार्यभार स्वीकारावा लागणार आहे.

बाबासाहेब बेलदार यांची धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

श्रीधर डुबे यांची मुंबई महानगर क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आर एस चव्हाण यांची हापकीन जीव औषध निर्माण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles