महावितरणचा मोठा निर्णय ! आता तुमचं वीजबिल माफ होऊ शकतं… असा करा अर्ज…

पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला गती देण्यासाठी महावितरणकडून विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजनेअंतर्गत पात्र वीज ग्राहकांचे वीजबिल माफ होणार असून, घराच्या छतावर १ किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प अत्यंत अल्प खर्चात बसविण्याची मोठी संधी उपलब्ध झाल्याची माहिती महावितरणकडून निवेदनाद्वारे देण्यात आली.

देशभरात मे महिना ‘सोलार महिना’ म्हणून साजरा केला जात आहे. यानिमित्ताने ‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजने’ला गती देण्यासाठी जनजागृतीचे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याच संधीचा फायदा घेत स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजनेअंतर्गत वीज ग्राहकांना आपल्या घराच्या छतावर १ किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प अत्यंत अल्प खर्चात बसविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली असून, या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

‘स्मार्ट’ योजनेचा मुख्य उद्देश दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिना १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणे हा आहे. या प्रकल्पामुळे पात्र ग्राहकांना पुढील सुमारे २५ वर्षे मोफत वीज मिळणार आहे. ही योजना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर राबविण्यात येत असल्याचेही महावितरणकडून नमूद करण्यात आले.
केंद्र सरकार पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतून १ किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी ३० हजार रुपये, तर राज्य सरकारकडून १७ हजार ५०० रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना केवळ २ हजार ५०० रुपये, अनुसूचित जाती आणि जमातीतील वीज ग्राहकांना ५ हजार रुपये, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्वसाधारण ग्राहकांना केवळ १० हजार रुपये भरावे लागणार आहेत. उर्वरित सर्व रक्कम केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान स्वरूपात वर्ग केली जात असल्याने ग्राहकांवर आर्थिक भार पडणार नसल्याचा दावाही महावितरणकडून करण्यात आला.

अर्ज कसा करायचा ?
केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्यघर’ मोबाईल ॲप किंवा अधिकृत संकेतस्थळावर या योजनेची माहिती आहे. तसेच महावितरणच्या ‘iSMART’ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्यात येत असून, अधिक माहितीसाठी किंवा अर्ज प्रक्रियेत मदतीसाठी महावितरणच्या संबंधित शाखा किंवा उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधवा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles