नेवासा तालुक्यात हळहळ; ट्रॅक्टर अपघातात मामासह दोन भाच्यांचा जागीच मृत्यू

ट्रॅक्टर अपघातात मामासह दोन भाच्यांचा जागीच मृत्यू: सुट्टीसाठी आले होते आजोळी

सोनई, : खरवंडी-तामसवाडी शिवारात रस्त्यावर ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात दोन भाच्यांसह मामाचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी रात्री ही घटना घडली. अभिषेक रघुनाथ दरंदले वय 16 व विजय रघुनाथ दरंदले वय 14 व त्यांचा मामा रामेश्वर बाळासाहेब मराठे रा. खरवंडी, ता. नेवासा अशी मृतांची नावे आहेत.

सोनई येथील दत्तनगर भागातील दरंदले परिवारातील अभिषेक व विजय हे दोन सख्खे भाऊ उन्हाळी सुटीनिमित्त मामा रामेश्वर मराठे यांच्याकडे खरवंडीला गेले होते.

रात्री शेतातून परतताना अपघात
मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास खरवंडी-तामसवाडी शिवारातून जाताना ट्रॅक्टर रस्त्यावर उलटला. त्यात तिघेही ट्रॅक्टरखाली दबले गेले. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने नेवासा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. नेवासा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे सोनई व खरवंडी गावावर शोककळा पसरली.

तालुक्यात हळहळ व्यक्त
या घटनेनंतर खरवंडी गावात शोककळा पसरली होती. मंगळवारी रात्री तिघांवर मराठे यांच्यावर खरवंडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, तर दोन्ही भावांवर सोनई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे नेवासा तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास शनिशिंगणापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार पवार करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles