सोशल मीडिया सध्याच्या घडीचे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे मनोरंजन करणारे माध्यम झाले आहे. त्यावर विविध विषयांवरील माहितीपासून ते विविध घटनांचे चांगले-वाईट व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ आपल्या काळजाचा थरकाप उडवतात; तर काही व्हिडीओ आपले मनोरंजन करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक तरूणी खूप भन्नाट डान्स करताना दिसतेय.
आपली कला सादर करण्यासाठी लोक सर्रास सोशल मीडियाचा वापर करतात. डान्स, गाणी, अभिनय, पेंटिंग, रेसिपी, कविता अशा विविध कलाकृती लोक आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करून जगासमोर आणतात. त्याचील काही लोकांचे व्हिडीओ जगभरातील कानाकोपऱ्यात पोहोचतात ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी, पैसा मिळतो. सध्या अशाच एका तरूणीचा डान्स सोशल मीडियावर इतका व्हायरल होतोय जो पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरूणी “आजा नचले” या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. यावेळी तरूणीने या खऱ्या गाण्यातील माधुरी दीक्षितसारखा पोशाख परिधान केला आहे. शिवाय ती करत असलेला डान्स, त्यातील स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर अनेक जण खूप कौतुक करत आहेत.हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ksuskalology या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.


