वादळ आलं अन् गावातील लग्नात ‘गेम’ झाला… क्षणात हवेत उडाला मंडप, वऱ्हाडींची भन्नाट आयडिया;पाहा व्हिडीओ

सध्या लगीनसराई सुरू आहे. आता लग्न म्हटलं की या एका सोहळ्यात अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी घडत असतात आणि त्यांचे विविध तऱ्हा दर्शविणारे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्यामध्ये अजब-गजब उखाणा, लग्नातील डान्स, वेगवेगळ्या हटके गोष्टी आदी अनेकविध व्हिडीओंचा समावेश असतो. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास दिवस असतो. भारतात लग्न म्हणजे काही ना काही नवीन गोष्टी घडतातच. कधी काय होईल याचा अंदाज करणे कठीणच असते. आता अशाच एका लग्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. असं त्या लग्नात काय घडलं असेल बरं…

दरम्यान, काही लग्नांतील दृश्ये सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय बनली आहेत. प्रत्येक जोडप्यासाठी लग्नाचा दिवस खूप खास असतो आणि लोक तो दिवस अगदी थाटामाटात साजरा करण्यासाठी खूप काही करतात. मात्र, एका लग्नात अचानक आलेल्या वादळानं असं काही केलं की, ते लग्न म्हणजे संस्मरणीय सोहळा ठरेल. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून नेटकरी त्यांचे हसू आवरू शकले नाहीत. त्या लग्नात नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ…सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका गावात घराबाहेर लग्न होणार असल्याने सुंदर सजावट करून मंडप टाकण्यात आला. पण, थोड्याच वेळात लग्न सुरू असताना एक चक्रीवादळ आलं आणि त्यामुळे सर्वांचीच खूप मोठी धांदल-गडबड झाली. वारे इतक्या जोरानं वाहू लागले की, उभारलेला लग्नाचा संपूर्ण मंडपच उडून गेला. या लग्नातील लोक उभारलेल्या तंबूला सर्वतोपरी सावरण्याचे आणि तो उडून जाऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न करू लागले. या लोकांनी पूर्ण ताकदीनिशी तंबूचे बांबू खेचून मंडप वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. पण, शेवटी निसर्गासमोर कुणाचे चालत नाही. परिणामी मंडप हवेत उडून जातो. उडून गेलेल्या मंडपाचा हा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे. ही घटना नेमकी कधी आणि कुठे घडली याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
https://x.com/your_roop/status/1919309474650616188?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1919309474650616188%7Ctwgr%5E2471e32571866250b8b9e93415d0e73f18bbfb1e%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2Fviral-village-wedding-video-storm-blows-away-mandap-guests-funny-reactions-make-people-laugh-on-social-media-pdb-95-5869946%2F
हा व्हिडीओ @RupeshRupam95 या एक्स हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles