सोशल मीडियावर महिलेची बदनामी भोवली ; नगर शहरात गुन्हा दाखल

अहिल्यानगर – शहरातील सायबर पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेच्या तक्रारीवरून सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला आणि त्यांच्या ओळखीचे दत्तात्रय खेमनर यांचे एकांतातील खाजगी फोटो फेसबुकवर सार्वजनिक करून त्यांच्या वैयक्तिक गोपनीयतेचा भंग केल्याचा ठपका आरोपींवर ठेवण्यात आला आहे.याप्रकरणी जय ओबीसी नावाचे फेसबुक पेज आणि हर्षवर्धन बारवकर या फेसबुक खातेधारकाविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि दत्तात्रय खेमनर यांनी संमतीने काढलेले खाजगी फोटो या फेसबुक पेजेस आणि खात्यावरून अनधिकृतपणे प्रसारित करण्यात आले. २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.आपली बदनामी करण्याच्या आणि एकांतपणाचा भंग करण्याच्या उद्देशानेच हे कृत्य केल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून सोशल मीडियाचा गैरवापर करणार्‍यांविरुद्ध सायबर पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले हे स्वतः करत आहेत.

 

अहिल्यानगर – गांधी मैदान चौक परिसरात मोबाईल नंबर मागितल्याच्या कारणावरून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तनवीर गुलाम हुसेन शेख (वय ३८, रा. आनंदीबाजार) हे गांधी मैदान परिसरातून पायी जात होते.

यावेळी त्यांनी तेथे असलेल्या ऋषीकेश नावाच्या तरुणाकडे त्याच्या मालकाचा मोबाईल नंबर मागितला. याचा राग आल्याने ऋषीकेश याने तनवीर यांच्याशी हुज्जत घालून त्यांची गचंडी पकडली. नंतर ऋषीकेश आणि त्याच्यासोबत असलेल्या पुंड नावाच्या व्यक्तीने त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनीही तनवीर यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेनंतर तनवीर शेख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी पुंड आणि ऋषीकेश यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles