अहिल्यानगर- शहरातील केडगाव परिसरात असलेल्या एका साडी डेपोसमोर लग्नाच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सौमित्र चंद्रशेखर रासने हे केडगाव परिसरात व्यापार करतात. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ते नगर-पुणे रस्त्यावरील एका साडी डेपो जवळ उभे होते. यावेळी आरोपी अक्षय राजू पवार तिथे आला आणि त्याने सौमित्र यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तुला मुलीशी लग्न करायचे आहे का? असे विचारत आरोपीने फिर्यादीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. हा वाद इतया विकोपाला गेला की, आरोपीने सौमित्र यांच्या कानाखाली मारून त्यांना खाली पाडले. त्यानंतर जवळच पडलेला दगड उचलून त्यांच्या डोयात मारून गंभीर जखमी केले. आरोपीने यावेळी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर सौमित्र रासने यांनी तातडीने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी अक्षय पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
———————————————————————————————————–
अहिल्यानगर-शहरातील केडगाव परिसरात जुन्या वादातून एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचा राग मनात धरून सहा जणांच्या टोळीने पती, पत्नी आणि मुलीला लोखंडी पाईप व लाकडी दांडयाने मारहाण करत गंभीर जखमी केले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी किरण लोंढे यांच्यात कुत्रा भुंकल्याच्या कारणावरून दुपारी वाद झाला होता. या वादाची तक्रार देण्यासाठी फिर्यादी पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. याचाच राग धरून रात्री आठ वाजेच्या सुमारास हॉटेल वैष्णवराज समोर संतोष सातपुते, किरण लोंढे, रामदास सातपुते, काशीनाथ मोढवे, बंडू सातपुते आणि तुन्या यांनी पीडित कुटुंबाला गाठले. आमच्या विरोधात तक्रार का देता? असे म्हणत आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. यावेळी आरोपींनी लोखंडी पाईप आणि लाकडी दांडयाने कुटुंबातील सदस्यांवर हल्ला चढवला. यामध्ये फिर्यादीच्या पतीच्या पायावर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली असून, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या मुलीलाही आरोपींनी अमानुषपणे मारहाण केली. हल्ल्यानंतर आरोपींनी पीडितांच्या दुचाकीची तोडफोड करून मोठे नुकसान केले. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडित कुटुंब दवाखान्यात असताना आरोपींनी त्यांच्या घरातील धान्याच्या गोण्यांचेही नुकसान केल्याचे समोर आले आहे.


