Saturday, November 15, 2025

विकास मंडळाच्या अपूर्ण इमारतीचे व शॉपिंग कॉम्प्लेक्स चे काम पूर्ण करणार, सर्वसाधारण सभेत सभासदांचा निर्धार

विकास मंडळाच्या अपूर्ण इमारतीचे व शॉपिंग कॉम्प्लेक्स चे काम पूर्ण करणार..

विकास मंडळाच्या सर्वसाधारण सभेत सभासदांचा निर्धार.

अहिल्यानगर -अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाची 40 वी सर्वसाधारण सभा अध्यक्ष प्रल्हाद भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली व गुरुमाऊली सदिच्छा मंडळाच्या प्रमुख नेते, विकास मंडळाचे विश्वस्त व सभासदांच्या उपस्थितीत संपन्न झाली.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सावित्रीबाई फुले, जिजाऊ मासाहेब, अहिल्यादेवी होळकर व सरस्वती देवी यांच्या प्रतिमांचे पूजन करून सभेला सुरुवात झाली.यावेळी प्रास्ताविक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष विलास गवळी यांनी प्रास्ताविक केले..
विकास मंडळाचे अध्यक्ष श्री प्रल्हाद भालेकर यांनी विकास मंडळाच्या वर्षभरातील कारभाराचा लेखाजोखा सभासदांसमोर मांडला. यावेळी त्यांनी अनेक वर्षापासून गाळेधारक थकलेले भाडे देत नाहीत. तसेच अनेक भाडेकरूंनी पोट भाडेकरू ठेवले आहेत. त्यांच्याकडून लवकरच वसुली करण्यात येईल. पुणे येथील धर्मदाय आयुक्त मध्ये त्यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली आहे. येत्या 25 जुलैला याबाबतच्या या चिकेवर सुनावणी होऊन संबंधित गाळेधारकांकडून सर्व थकीत भाडे वसूल करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच शहराच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागेवर नियोजित विकास मंडळाचे इमारतीचे बांधकाम व शॉपिंग कॉम्प्लेक्स सभासदांनी आर्थिक सहकार्य करून पूर्ण करावे, जेणेकरून शिक्षकांच्या या वास्तूचे पुनर्जीवन होईल व अनेक सभासदांची इच्छा पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी शिक्षक संघाचे नेते बापूसाहेब तांबे, दत्ता पाटील कुलट, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विद्याताई आढाव, जिल्हा संघाचे अध्यक्ष बबन दादा गाडेकर, गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष संतोष दुसंगे, गोकुळ कळमकर, माजी व्हाईस चेअरमन अर्जुनराव शिरसाट, बाबासाहेब खरात, राजेंद्र सदगीर, राजेंद्र ठोकळ नारायण पिसे ,राजेंद्र कुदनर रवींद्र पिंपळे, विकास मंडळ सल्लागार समितीचे अध्यक्ष भास्कर कराळे, माजी चेअरमन साहेबराव अनाप, रविकिरण साळवे,सुयोग पवार, सचिन नाबगे, संदीप ठाणगे, आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सर्व उपस्थित सभासदांच्या वतीने नारायण पिसे यांनी नियोजित विकास मंडळाचे इमारतीचे व शॉपिंग कॉम्प्लेक्स चे बांधकाम ऐच्छिक निधीतून पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून, आतापर्यंत जवळपास साडेसहाशे सभासदांनी विकास मंडळाकडे प्रत्येकी एक लाख रुपये ठेव वर्ग करण्याचे हमीपत्र दिले आहे. व इतरही अनेक सभासद विकास मंडळाकडे ठेव वर्ग करण्यासाठी इच्छुक आहेत. जवळपास 1000 सभासद विकास मंडळ बांधकामासाठी निधी देण्यासाठी तयार आहेत. कोणतीही समन्वय समिती न नेमता आपण हे काम सर्व मिळून पूर्णत्वाला नेऊ. यावेळी अनेक वेळा समन्वय समिती नेमली परंतु ती मिटींगला अनेक वेळा पत्र देऊनही कधीच उपस्थित राहीले नाही.त्यांनी यावेळी विकास मंडळ इमारत व शॉपिंग कॉम्प्लेक्स चे बांधकाम करण्याचा ठराव मांडला. त्यास माजी विश्वस्त विठ्ठल काकडे यांनी अनुमोदन दिले…
जिल्हाध्यक्ष बबनदादा गाडेकर यांनी येत्या दसऱ्याला कोणत्याही परिस्थितीत भूमिपूजन करायचेच आणि कामाला सुरुवात करायची अशा पद्धतीचे नियोजन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या
विकास मंडळाचे सचिव संतोष आंबेकर यांनी सभेपुढे एक ते सहा विषय मंजुरीसाठी टाकले सर्व सभासदांनी एकमताने सर्व विषय मंजूर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त मुकुंदराज सातपुते यांनी केले. यावेळी माजी अध्यक्ष प्रदीप दळवी, विश्वस्त सलीम खान पठाण,दिलीप गंभीरे, संतोष शेंडगे,श्रीम मनीषाताई गाढवे, नवनाथ दिवटे ,बाळासाहेब गमे, राजेंद्र निमसे, संतोष आंबेकर, गणेश गायकवाड, श्रीमती सुवर्णा राठोड,संतोष मगर, दत्तू फुंदे चांगदेव काकडे, श्रीमती अनिता उगले, शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब तापकीर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत जगताप व्यवस्थापक सुरेंद्र आढाव आदिंसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles