राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात आमरण उपोषण.
खोटे अपंग प्रमाणपत्र, खोट्या घटस्फोटीत व खोट्या परितक्त्या यांची कोणती तपासणी न करता खोट्या दाखल्यांवर संवर्ग एक मधून बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट केल्याचा आरोप.
बेरोबाबदार पडताळणी समिती, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी.
नगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग मध्ये सन २०२५ च्या जिल्हा अंतर्गत शिक्षक बदलीतील संवर्ग एक मध्ये बदली प्रक्रियेमध्ये जिल्हा शिक्षणाधिकारी व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून खोटे अपंग, खोट्या घटस्फोटीत व खोट्या परितक्त्याची कोणतीही तपासणी न करता फक्त खोट्या दाखल्यावर त्यांना संवर्ग एक मधून बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट केल्या असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर पंचमुख यांचे जिल्हा परिषदेच्या आवारात आमरण उपोषण सुरू करण्यात आले यावेळी विजय शिरसाठ, स्वप्निल साठे, विशाल भिंगारदिवे, अँड. अशोक पालवे, अजय बडोदे, ऋषिकेश खुडे, अँड रामदास आडगले, रवी गव्हाणे, योगेश भालेराव, दत्ता शेठ, तुकाराम कोटकर, रोहित आढाव, गौरव नरवडे, अल्हाट सर, संदीप वाकचौरे, अमोल इंगळे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, संवर्ग एक मधून अर्ज केलेले सर्व अपंग शिक्षक, शिक्षिका, त्यांचे पाल्य, माता-पिता यांची जे. जे. रुग्णालय मुंबई येथे इन कॅमेरा शारीरिक तपासणी करावी व दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे तसेच घटस्फोटीत शिक्षिका यांचे प्रमाणपत्र जुने पूर्वीचे असून काहींनी पुनर्विवाह केले आहेत त्यांची नव्याने संतती ही आहे. म्हणून त्यांची आजची वैवाहिक स्थिती व त्यांची घटस्फोटानंतर आजची आपत्य स्थिती याबाबत सखोल चौकशी पोलीस यंत्रणेमार्फत करावी व खोट्या घटस्फोटीत यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे तसेच परीतक्त्या शिक्षिका यांनी खोटी माहिती देऊन खोटे दाखले मिळवलेले आहे. परितक्त्या होऊन वर्षाच्या वर कालावधी उलटूनही या महिलांनी न्यायालय, पोलीस व दिलासा सेलमध्ये साधी तक्रार करून नोंदणी ही केलेली नाही. पतीशी सगंमत करून खोटी नोटरी केली आहे या सर्व परितक्त्या शिक्षकेची पोलीस यंत्रणे कडून घरी जाऊन चौकशी करून खोट्या परितक्त्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे व त्यांना देखील सेवेतून बडतर्फ करण्यात यावे तसेच खोटे अपंग खोट्या घटस्फोटीत व खोट्या परितक्त्यायांची कोणतीही तपासणी न करता पडताळणी समितीने त्यांचे बदली अर्ज मान्य केले आहे या बेजबाबदार पडताळणी समितीवर व बेजबाबदार शिक्षणाधिकारी व तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी यांच्यावर कर्तव्यात कसूर करणे शिस्तभंग करणे अधिकाराचा गैरवापर करणे याबाबत कठोर कारवाई होऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शिक्षक बदलीत प्रक्रियेमध्ये खोटे अपंग प्रमाणपत्र,जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
- Advertisement -


