Sunday, February 22, 2026

नगर शहरातील अवजड व अवैध प्रवासी वाहतूक तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पोलीस प्रशासनाला निवेदन

अहिल्यानगर शहरातील अवजड व अवैध प्रवासी वाहतूक तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पोलीस प्रशासनाला निवेदन

तारकपूर येथे सुरेखा होनराव यांचा अवजड वाहतुकीमुळे दुर्दैवी मृत्यू

अहिल्यानगर : शहरालगत असणाऱ्या बायपास वरून वाहतूक सुरू झाली असतानाही अवजड वाहने मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरांमध्ये येत आहे त्यामुळे वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे, वारंवार पोलीस प्रशासनाला विनंती करून देखील ही अवजड व अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे, ती तातडीने बंद करून कारवाई करण्याची मागणी शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यार्थी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांनी निवेदनाद्वारे केले आहे.
यावेळी प्रा. माणिकराव विधाते, सुरेश बनसोडे, सागर गुंजाळ, सुरज शहाणे, स्वप्निल भोर, ओंकार आव्हाड, भाऊ वनवे, अनिकेत होनराव, अतुल कचरे, संजय होनराव, शिवम होनराव, ओम होनराव, समर्थ होनराव, कौशल काटकर, सचिन होनराव, अतुल कचरे, कृष्णा हरबा, श्रवण बोरा, अक्षय काटकर, अभिषेक मिसाळ, विशाल तोडकर, अभिजीत गंधे, अथर्व कुलकर्णी, जय वर्मा आदी उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हंटले की, अहिल्यानगर शहरातील राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग तसेच बाजारपेठ रस्त्यांवर कायम अवैध प्रवासी वाहतुक व अवजड वाहतुक करणारे हे कधीही सुस्थितीत वाहने चालवत नाही. तसेच काही अवजड वाहनांतील चालक हे मद्य प्राशन करुन वाहतुक करतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून सदर वाहनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच शहरात सध्या विविध रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. परंतु ज्या रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत त्या ठिकाणाहुन अशी वाहने राजरोसपणे वाहतुक करतात. तसेच काही दिवसापुर्वी जड वाहतुकीमुळे सुरेखा गुरुलींगअप्पा होनराव यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. बाह्यवळण रस्ता पुर्णत: कार्यान्वित झालेला असून त्याचा वापर केला जात नाही. त्यामुळे अवजड वाहतुक ही शहरांतर्गत होत आहे. वारंवार वाहतूक शाखा तसेच प्रशासनाला सुचना देऊन देखील कुठल्याच प्रकारच्या उपाययोजना जड वाहतुकीबाबत होत नाही. त्यामुळे निष्पाप लोकांचा जीव जात आहे. तरी अहिल्यानगर शहरातील अवैध प्रवासी वाहतुक व अवजड वाहतुकीमुळे होणारी वाहतुक कोंडी बंद न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी हे आपल्या पोलीस स्टेशनच्या व वाहतुक शाखेच्या दालनात ठिय्या आंदोलन करतील असा इशारा निवेदनातून देण्यात आला.

चौकट : शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी शिष्टमंडळास सांगितले की, जड वाहतुकीवर कारवाई केली जाईल, वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, तसेच महापालिकेने देखील शहरातील चौकाचौकात असणारे सिग्नल तातडीने सुरू करणे गरजेचे आहे, डीएसपी चौकातील सिग्नल यंत्रणा खूप जुन्या पद्धतीची असल्यामुळे त्यावर आकडे येत नाही तरी काही चौकातील तरी सिग्नल सुरू करण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या पॅगो रिक्षा यांची देखील तपासणी केली जाईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles