Wednesday, March 18, 2026

कांद्याच्या दरात घसरण शेतकरी आक्रमक ; कांद्याला हमीभावासह अनुदान द्या, नाहीतर गांजा विकण्याची परवानगी द्या

सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. कारण कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कांद्याला प्रति क्विंटल 700 ते 800 रुपयांचा दर मिळत आहे. ऐन सणासुदीत शेतकरी अडचणीत आले आहेत. कांद्याच्या मिळणाऱ्या दरातून शेतीचा खर्चही निघत नसल्याच्या भावाना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळं कांद्याला हमीभाव द्या आणि विकलेल्या कांद्याला अनुदान द्या, नाहीतर गांजा विकण्याची परवानगी द्या, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या शेतकऱ्यांनी केली आहे. इराण व इस्रायल, अमेरिका युद्धाचा परिणाम तसेच आखाती देशात कांद्याची कमी झालेली निर्यात तसेच देशांतर्गत विविध राज्यातून कांद्याची वाढलेली आवक यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या बाजारपेठेत सध्या कांदा दरात घसरण झाली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात कांद्याचे भाव सातत्याने घसरत असल्याने शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे. कांद्याला हमीभाव द्या किंवा विकलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल 500 रुपये अनुदान द्यावं, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, हे ही शक्य नसेल तर गांजा पिकविण्याची परवानगी द्यावी अशी संतप्त मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.

या युद्धामुळे भारतातील पश्चिम आशियाला होणाऱ्या कांद्याची निर्यात ठप्प झाल्याचं दिसून येतंय. त्याचा फटका विशेषतः नाशिकला बसल्याचं दिसतंय. नाशिकमधून पश्चिम आशियाला मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात होत असते. मात्र, इराण इस्त्रायल अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम कांद्याच्या निर्यातीवर झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळं शेतकरी आधीच चिंतेत आहे. कांद्याची निर्यात ठप्प झाल्याने देशांतर्गत आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याच्या किमतीत मोठी घसरण होणार असून त्याचा फटका हा थेट शेतकऱ्यांना बसणार आहे.साधारणत: गेल्या दोन महिन्यांत कांद्याचे दर क्विन्टलला 700 ते 800 रुपयांनी घसरले आहेत. नाशिक जिल्ह्यात आंदोलनाचे सत्र सुरू झाले आहे. लाल कांद्याची आवक वाढलेली असताना देशांतर्गत घटलेली मागणी आणि थंडावलेली निर्यात घाऊक बाजारातील दरावर प्रभाव पाडत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles