Tuesday, March 24, 2026

मोठा गौप्यस्फोट! महाराष्ट्राचे राजकारण तापले ,मंत्रिमंडळातील ९ मंत्री खरातचे भक्त

नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे सध्या महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. या प्रकरणात आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. संजय राऊत यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत. राज्यातील ९ मंत्री या भोंदू बाबाचे नियमित भक्त होते आणि ते अत्यंत घृणास्पद विधी करत होते, असा दावा राऊतांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, या भोंदू बाबाने पोलिसांना जी माहिती दिली आहे, ती जरी गोपनीय असली तरी महाराष्ट्राच्या सध्याच्या मंत्रिमंडळातील नऊ मंत्री त्याचे नियमित भक्त होते. हे मंत्री भोंदू बाबाकडे जाऊन ‘अत्यंत घृणास्पद’ प्रकारचे विधी करत होते. ही केवळ अंधश्रद्धा नसून महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकित करणारे हे प्रकरण आहे. दरम्यान, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राऊतांनी लावून धरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे खरात यांच्यासोबतचे अनेक फोटो समोर आले असून त्या टीकेच्या धनी ठरल्या आहेत. संजय राऊत यांनीही चाकणकरांवर टीकास्त्र सोडलं आहे. हा विषय फक्त महिला आयोगाच्या अध्यक्षांपुरता मर्यादित नाहीये ना. या प्रकरणात मंत्रीमंडळातले काही मंत्री आहेत, काही महत्वाचे नेते आहेत, याांचाही विचार केला पाहिजे. महिला आगोयाच्या अध्यक्षांना तर जावचं लागेल, त्यांना घालवण्यात मुख्यमंत्री कमी पडले तर ते राज्याचं दुर्दैव ठरेल, असं राऊत म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles