श्रीरामपूर : ब्राह्मणगाव वेताळ येथील सरपंच मनीषा समाधान शिंदे व सदस्य वर्षा अमोल म्हस्के यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केल्याने त्यांच्या अपात्रतेचा जिल्हाधिकारी यांचा निर्णय विभागीय आयुक्त यांनीही कायम ठेवला आहे. बाजार समितीचे माजी संचालक व माजी सरपंच राधाकृष्ण आहेर यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती.
आयुक्त अजय मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला आहे. सरपंच शिंदे यांचे पती समाधान भाऊसाहेब शिंदे यांना रमाई आवास योजनेंतर्गत ३०० चौरस फूट घरकुल मंजूर झाले होते. त्या घरकुलाव्यतिरिक्त ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांच्या पतीने ७२६ चौमीचे बेकायदेशीर बांधकाम केले. तसेच त्यांनी जे बांधकाम केले, तो सरकारी मालकीचा गट होता. त्या जागेत अतिक्रमण केल्याने तहसीलदार यांनी अतिक्रमण काढण्याची नोटीस दिली होती. तरीही शिंदे यांनी अतिक्रमण काढले नाही. अखेर राधाकृष्ण आहेर यांनी त्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. ग्रामपंचायत सदस्य वर्षा म्हस्के यांचे पती अमोल यांनी ग्रामपंचायत मालकीच्या गायरान जागेवर दूध संकलनाचा व्यवसाय केला होता. त्यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्याची गंभीर दखल घेण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी होऊन दोघांचेही सदस्यत्व रद्द करण्यात आले. आदेशाला नाशिक विभागीय आयुक्तांसमोर आव्हान देण्यात आले होते. आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांचा निर्णय कायम ठेवला
शासकीय जागेत अतिक्रमण ; अहिल्यानगर जिल्ह्यातील महिला सरपंचासह सदस्य अपात्र
- Advertisement -


