नुसते पंचनामे नको प्रत्यक्षात नुकसान भरपाई द्या – सुजित झावरे पाटील.
पारनेर तालुक्यात ढवळपुरी येथील वाघवाडी, भनगडेवाडी व ढवळपुरी परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. आज प्रत्यक्षात शेतावर जाऊन पाहणी करताना सुजित झावरे पाटील. यावेळी परिसरातील कलिंगड, वाटाणा, कांदा, डाळिंब, झेंडू, गहू, आंबा, चारापीक, संत्री व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यावेळी कृषी व महसूल विभागामार्फत नुकसान भरपाई पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच बबनराव पवार, सुधाकर अण्णा गावडे, बाबाजी चौधरी, नाना चौधरी, बाळू देशमुख, सोनाजी देशमुख, अण्णा वाघ, शिवाजी खोडदे, संदीप वाळुंज, किरण वाळुंज, संदीप वाळुंज, विश्वनाथ वाघ, निलेश चौधरी, भिकाजी वाघ, किसन वाघ, जयसिंग वाघ, संदीप चौधरी, बबन नरसाळे, विलास वाघ, कैलास शिंदे, अशोक कुटे, भाऊ नरसाळे, सुनिल थोरात, नवनाथ वाघ, नागेश शेळके, रामा देशमुख, ऋषिकेश वाघ, शेरीबा देशमुख अनेक नुकसानग्रस्त शेतकरी यावेळी उपस्थितीत होते.
पारनेर तालुक्यातील वाघवाडी, भनगडेवाडी धोत्रे व ढवळपुरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वादळीवार्यासह गारपीट झाली. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळाली अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे करणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.


