घरगुती गॅस सिलेंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय, गॅस कमी दिवस पुरणार ….

घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणात महत्वाचा बदल करण्याचे सरकारने ठरवले आहे. घरगुती वापराचा गॅस सिलिंडर नागरिकांना आता अर्ध्याच वजनाचा मिळणार आहे. घरगुती वापराचा गॅस सिलिंडर 14.2 किलोच्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येतो. मात्र, आता हा घरगुती वापराचा गॅस 8 ते 10 किलोच्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येणार आहे. सिलेंडर तोच राहणार आहे. मात्र, त्यामध्ये गॅस आठ ते दहा किलोच्या प्रमाणात भरण्याचे आदेश गॅस कंपन्यांना देण्यात आलेत. जेवढा गॅस असेल तेवढे पैसे आकारले जाणार आहेत. युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या भरुन तयार असलेले 14.2 किलोचे सिलेंडर संपल्यानंतर नवीन सिलेंडर आठ ते दहा किलोच्या प्रमाणात भरण्यात येणार आहेत. यापुढे गॅस सिलेंडर कमी वजनाचे असल्याने ते साहजिकच कमी दिवस पुरणार आहेत. त्यामुळे सामान्य घरातील दैनंदिन गणित बिघडणार आहे. यावर सामान्य नागरिक कशाप्रकारे व्यक्त होणार, हे बघावे लागेल. याशिवाय, कमी वजनाच्या या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत किती असणार, याकडेही सगळ्यांच्या नजरा आहेत.

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल हे युद्ध दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये इस्रायलने इराणमधील गॅस फिल्ड आणि खनिज तेलाचे साठे असलेल्या परिसरांमध्ये हवाई हल्ले केले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतारमधील सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा असलेल्या परिसराला लक्ष्य केले आहे. यामुळे युद्ध संपल्यानंतरही या सुविधा पूर्ववत होण्यासाठी बराच वेळ जावा लागेल. त्यामुळे पुढील काही महिने जगभरात गॅसची टंचाई असेल, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने आवश्यक ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये एलपीजी गॅसच्या तुटवड्याच्या भीतीने नागरिकांनी अनेक ठिकाणी गॅस एजन्सीबाहेर रांगा लावल्याचे दिसून आले होते. सरकारने वारंवार आवाहन करुनही नागरिकांना घरगुती सिलेंडर मिळणार की नाही, याबाबत धास्ती कायम आहे. दरम्यान, गॅसच्या तुटवड्यामुळे सरकारने व्यावसायिक वापराच्या एलपीजीसाठी गॅस पुरवठा बंद केला होता. त्यामुले हॉटेल इंडस्ट्रीवर गंडांतर ओढवले होते. मात्र, आता मध्यपूर्वेतील (इराण-इस्त्रायल) युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली गॅस टंचाई दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने व्यावसायिक LPG पुरवठ्यात 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील हॉटेल्स, ढाबे आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना मोठा दिलासा मिळणार असून, वाढीव पुरवठा तत्काळ लागू करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles