राज्यात जोरदार पावसाची शक्यता, ;हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा मोठा इशारा

शेतकऱ्यांचे डोळे मान्सूनकडे लागले होते. अखेर प्रतिक्षा संपली आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे. मान्सून तळकोकणात दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून तब्बल 25 जिल्हांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचं अवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानंतर आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील राज्यात मान्सूनची पुढील वाटचाल कशी असेल याबाबत आपला अंदाज व्यक्त केला आहे.

‘मान्सून तळकोकणातून सक्रिय झाला आहे. तो आता हळहुळ पुढे सरकत आहे. सात तारखेचा पाऊस हा सर्वदूर होणार नाही. 8 जून, 9 जून असा थोडा-थोडा करत मान्सून राज्यात पुढे सरकणार आहे. 14 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्राचा बरासचा भाग कव्हर करेल असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवलेला आहे. सात जूनच्या रात्रीपर्यंत बऱ्याच भागांमध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे, बीड जिल्हा, लातूर, जिल्हा धाराशिव जिल्हा मराठवाड्यापर्यंत मान्सून मजल मारेल. उत्तर महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांपर्यंत मान्सून पोहोचेल अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना देखील सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, जर शेतात एक इतिपेक्षा जास्त ओल असेल तरच पेरणी करावी, एक किंवा दोन बोट ओल असेल तर पेरणी करू नये, असंही यावेळी डख यांनी म्हटलं आहे.
दरम्यान भारतीय हवामान विभागाकडून देखील मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सून तळकोकणात दाखल झाला आहे, परंतु तो अद्याप महाराष्ट्राच्या अनेक भागांपर्यंत पोहोचायचा आहे. येत्या 15 जून पर्यंत मान्सून राज्यातील बहुतांश भाग व्यापून टाकेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles