केडगाव मधील ओंकार सातपुते सह चार जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव परिसरात घडलेल्या जुन्या वादाच्या कारणावरून एका खासगी बँकेत कार्यरत असलेल्या ऑफिस बॉयला एक लाख रुपयांची मागणी करत जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निलेश साहेबराव पंचमुख (वय 34, रा. सिंध्दाथ नगर, नवबौद्ध वस्ती, अहिल्यानगर) हे आयसीआयसीआय बँकेच्या केडगाव शाखेत कंत्राटी पद्धतीने ऑफिस बॉय म्हणून कार्यरत आहेत. 26 मे 2026 रोजी बँकेच्या कामानिमित्त ते झेंडा चौक, केडगाव येथे गेले असता त्यांच्या पाठीमागून ट्रिपल सीट आलेल्या दुचाकीस्वारांची गाडी घसरून पडली. त्यानंतर संबंधितांनी पंचमुख यांना अडवून शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच त्यांना एका शाळेच्या परिसरात नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आली. यावेळी त्यांचा मोबाईल फोन, खिशातील रोख रक्कम व त्यांच्या ताब्यातील दुचाकी घेऊन गेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. नंतर बँक व्यवस्थापकांच्या मध्यस्थीने संबंधितांनी मोबाईल, पैसे व दुचाकी परत केल्याने त्यावेळी कोणतीही तक्रार करण्यात आली नव्हती.

मात्र, 9 जून 2026 रोजी सायंकाळी केडगाव येथील एका कार्यालयात बोलावून घेतल्यानंतर ओंकार दिलीप सातपुते, ओम किरण बारवकर, अभय कारखेले, अनिकेत शिर्के तसेच अन्य दोन जणांनी जुन्या घटनेचा संदर्भ देत मोबाईल फुटल्याची भरपाई म्हणून एक लाख रुपयांची मागणी केली, असा आरोप पंचमुख यांनी केला आहे.
पैसे देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर संबंधितांनी जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले तसेच “कामावर येऊ देणार नाही, हात-पाय तोडून टाकू” अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी निलेश पंचमुख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles