1950 नंतरचा सर्वात भीषण ‘एल निनो’ सक्रिय! मान्सूनसाठी धोक्याची घंटा; भारतावर दुष्काळाचे सावट?

प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याची घोषणा सीपीसी अर्थात क्लायमेट प्रेडीक्शन सेंटरने केली आहे. यंदा १९५० नंतरचा सर्वाधिक तीव्र ‘एल निनो’ राहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. एल निनो डिसेंबरमध्ये अति तीव्र होऊ शकतो असा अंदाज देखील आहे. २०२७ च्या पूर्वार्धातही ‘एल निनो’ सक्रिय असेल असा कयास बांधला जात आहे. प्रशांत महासागरातील न्यूट्रल स्थिती जाऊन एल निनो निर्माण झाल्याची घोषणा अमेरिकी हवामानशास्त्र संस्था नोआच्या क्लायमेट प्रेडिक्शन (सीपीसी) सेंटरने गुरुवारी केली. डिसेंबरपर्यंत एल निनोची तीव्रता अतितीव्र स्वरूपाची होणार असून, यंदाचा एल निनो १९५० पासूनच्या नोंदींमधील सर्वाधिक तीव्र ठरण्याची शक्यता सीपीसीने वर्तवली आहे. सीपीसीने गुरुवारी जारी केलेल्या अंदाजानुसार, गेल्या महिनाभरात एल निनोची स्थिती विकसित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यंदाचा एल निनो फेब्रुवारी २०२७ मध्येही सक्रिय राहण्याची शक्यता ९० टक्क्यांहून जास्त असल्याचे सीपीसीच्या अंदाजात म्हटले आहे

प्रशांत महासागरात एलनिनो सक्रिय झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. सीपीसी अर्थात क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरनं ही घोषणा केली
आहे. यंदा 1950 नंतरचा सर्वाधिक तीव्र असा एल निनो राहण्याचा अंदाज वर्तवला जातोय. एल निनो डिसेंबरमध्ये अति तीव्र होऊ शकतो असाही अंदाज असेल, 2027 च्या पूर्वार्धातही एलनेनो सक्रिय असेल असा कयास बांधला जातोय आणि अर्थातच या एल निनोचा मोठा परिणाम हा मान्सूनवर होतोय आणि त्यामुळे महाराष्ट्राला देखील त्याचा फटका बसू शकतो, सरासरी पेक्षा यंदा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे,एल निनोचा प्रभाव वाढतोय, त्याची वाटचाल सुरू झालेली आहे कसे परिणाम होऊ शकतात,एल निनोचे खास करून मान्सूनवर, या प्रश्नावरती माहिती देताना हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी सांगितलं की, सीपीसीने अधिकृतपणे सांगितलं आपण आधीपासूनच म्हणत होतो की एमनो जून मध्ये सक्रिय होणार पण आता आता गेल्या महिन्याभरातला प्रशांत महासागराच तापमान पाहून सीपीसीने कालच जाहीर केलं की, एल निनो सक्रिय झालेला आहे. याची तीव्रता उत्तरोत्तर वाढत जाणार आहे आणि ते डिसेंबर पर्यंत सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे

एल निनोचे वेगवेगळे टप्पे असतात, म्हणजे तीव्र, अतितीव्र जसा मध्ये आपण सुपर एल निनो असं पण एक संज्ञा वापरली जात होती. अतितीव्र स्वरूपामध्ये म्हणजे तिथलं तापमान हे सरासरी पेक्षा दोन ते अडीच अंशापर्यंत जास्त राहण्याची शक्यता आहे, बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की तीन अंशापर्यंत पर्यंत राहू शकत त्या त्यापेक्षा पण जास्त राहू शकत पण सीपीसीच्या अंदाजामध्ये तसं दाखवण्यात आलेल नाही, पण तरी सुद्धा 1950 पासूनचा हा सर्वात तीव्र एल निनो राहण्याची शक्यता आहे जेव्हा तीव्र एल निनो असतो तेव्हा त्याचे परिणाम जगामध्ये ज्या ज्या पद्धतीने असतात,तर ते हमखास होतात असं आतापर्यंतच्या याच्यावरून जे काही नोंदी आहेत त्याच्यावरून दिसून आले. त्याच्यापैकी भारत किंवा भारतीय उपखंडावरचा जो त्याचा परिणाम असतो, तो म्हणजे या भागामधला सरासरीपेक्षा पाऊस कमी होत असतो, अर्थात तो पाऊस होतच नाही असं नाही पण तो कमी होतो आणि स्वाभाविकपणे त्याला धरूनच ते अपेक्षित धरून आय एमडीने पण वर्तवले की यंदाचा पावसा सरासरी पेक्षा 90% पर्यंत राहू शकतो, पण त्यामध्ये सुद्धा आपण 5% कमी अधिक धरलेले आहे, त्यामुळे जेव्हा आपण 90% भारतामध्ये पाऊस म्हणतो सरासरीच्या तुलनेमध्ये त्यावेळेस त्याच प्रादेशिक वितरण पण कमी जास्त असतं, त्यामुळे ज्या भागामध्ये पाऊस ऑलरेडी कमी असतो, तिथे आणखीन पण कमी झाला, तर मात्र दुष्काळासारखी स्थिती उद्भवू शकते. एल निनो आता जूनच्या सुरुवातीलाच जाहीर झालाय, की तिथे सक्रिय झालाय त्यामुळे मॉन्सूनच्या प्रगतीपासून जे काही जुलै ऑगस्टमध्ये त्याच्यामध्ये सक्रिय कालखंड असतात, ब्रेक असतात, तर त्याच्यावर सुद्धा एलनिनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा संपूर्ण हंगामच एलनिनोच्या प्रभावाखाली राहण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे, अशी माहिती प्रभुणे यांनी दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles