राज्यात सध्या उन्हाचा कडाका आणि उकाडा प्रचंड वाढला आहे, ज्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. या बदलत्या आणि कडक हवामानाचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. दुपारच्या सत्रात शाळा भरत असल्याने विद्यार्थ्यांना उन्हाच्या तीव्र जाळा सहन कराव्या लागत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून पुढील १५ दिवस राज्यातील सर्व शाळा केवळ सकाळच्या सत्रातच भरवण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी आता पालक आणि विविध शिक्षक संघटनांकडून केली जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे शालेय विद्यार्थी कमालीचे त्रस्त झाले असून शाळांच्या वेळेत तातडीने बदल करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड मॅडम यांना समन्वय समितीच्या वतीने ” अलनिनो च्या प्रभावामुळे अद्यापपर्यंत मान्सूनचा पाऊस न झाल्यामुळे उष्माघात व वातावरणातील बदलामुळे सर्व शाळांमध्ये विद्यार्थी , पालक व भौतिक सुविधांना उन्हाळासदृश्य स्थितीमुळे व गर्मीमुळे येणाऱ्या अडचणींचा विचार करून शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्यात यासाठीचे निवेदन देताना शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे , चेअरमन आप्पासाहेब शिंदे , संचालक महेंद्र हिंगे , सूरज घाटविसावे व उपस्थित मान्यवर


