धीरज परदेशी मृत्यू प्रकरण;पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर आमदार संग्राम जगतापांच्या आरोपानी खळबळ

हिंदुत्वादी कार्यकर्ते धीरज परदेशी यांची जिहादी लोकांनी हत्या केल्यानंतर पोलिसांकडून तपास वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न होत आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना टार्गेट करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. याशिवाय मुख्य आरोपी पोलिसांना सापडत नसून, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे आरोपींना अभय देत आहे. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाची तातडीने दखल घेऊन या दोन्ही अधिकाऱ्यांना बडतर्फ करून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी आ.संग्राम जगताप यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत केली.

“या घटनेसंदर्भात कागदपत्र तयार होण्याआधीपासून चांगला सरकारी वकिल पाहिजे. ही घटना वेगळ्या दिशेने नेण्याचा पोलीस प्रयत्न करतायत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करणार आहोत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत.आमच्या मागण्या मांडणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधला. त्यांच्या भावना जाणून घेतल्या” असं संग्राम जगताप म्हणाले. “त्याच्यानंतर कालपासून वेगवेगळ्या घटना घडत आहेत. आंदोलन अंत्यविधी झाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा भूमिका बदलण्याचं काम केलं. म्हणून आज आम्हाला पत्रकार परिषद घ्यावी लागली” असं जगताप म्हणाले.

आमची जी मागणी होती त्यांची जी अनधिकृत घर आहेत त्यांना शासनाने नोटीस लावली. पण त्यांनी हायकोर्टात जाऊन स्टे मिळवला. यामागचे जे मास्टरमाइंड आहेत ते वेगळे आहेत. पोलीस कानाडोळा करतायत. दुर्लक्ष करतायाय. त्यामुळे या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे. धीरज परदेशी यांच्या पत्नीला शासनाच्या माध्यमातून नोकरी मिळाली पाहिजे. आमच्या हिंदुत्ववादी संघटनांकडून मदत दिली जाईल. पण सन्मानजनक नोकरी मिळाली पाहिजे” अशी मागणी संग्राम जगताप यांनी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles