एलपीजी ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आधार कार्डावर आधारित एलपीजी ई-केवायसी पूर्ण करण्याची शेवटची मुदत वाढवण्यात आली आहे. याआधी ग्राहकांना १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. आता ही मुदत वाढवून २३ ऑगस्ट २०२६ करण्यात आली आहे. त्यामुळे अजून ई-केवायसी न केलेल्या ग्राहकांना सुद्धा दिलासा मिळाला आहे. इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅस ग्राहकांना याबद्दल सातत्याने संदेश आणि अलर्ट करण्यात आलं होतं. पण डेडलाइन चुकली म्हणून तुमचे गॅस कनेक्शन कायमचं रद्द होईल, अशी परिस्थिती नाही. त्यासाठी तुम्ही पुढील नियम जाणून घेणं गरजेचं आहे. तेल मंत्रालय आण गॅस कंपन्यांच्या सूचनेनुसार, ज्या ग्राहकांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांची पडताळणी पूर्ण होईपर्यंत घरगुती दराने LPG सिलेंडर मिळायला अडचण येऊ शकते. काही प्रकरणांमध्ये कनेक्शन तात्पुरते निलंबित केले जाऊ शकते. पण ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर संबंधित सुविधा पुन्हा सूरू करता येऊ शकतात. e-KYC रखडलेला असल्यास घरगुती दराचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. अशावेळी ग्राहकांना लागू असलेल्या इतर दरानुसार सिलेंडर घ्यावा लागू शकतो. त्यामुळे घरगुती LPG च्या तुलनेत खर्च मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. ज्यांनी आधीच e-KYC पूर्ण केली आहे. त्यांना पुन्हा प्रोसेस करण्याची गरज नाही. पण e-KYC अजून केली नसेल तर ती शक्य तितक्या लवकर पूर्ण करणं महत्त्वाचं आहे. १६ ऑगस्टची मुदत संपली असली तरी कनेक्शन कायमटचं रद्द होत नाही. पण घरगुती एलपीजी मिळण्याच्या पात्रतेवर परिणाम होऊ शकतो.
घरगुती LPG ग्राहकांसाठी ई-केवायसी करण्याची मुदत संपली! आता सिलेंडर मिळणार की नाही?
- Advertisement -


