‘योजनेचे पैसे बंद झाले असल्यास महा-आयडी कार्ड काढल्याने पैसे पुन्हा सुरू होतात’, ‘महा-आयडी कार्ड काढल्यामुळे केवायसी पूर्ण होते’, ‘महा-आयडी कार्ड काढले नाही तर योजनेचा लाभ बंद होईल’ तसेच ‘आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केल्यास लाभ तात्काळ सुरू होतो’, अशा स्वरूपाची दिशाभूल करणारी माहिती लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिली जात आहे. या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन महिला व
बालविकास विभागाने केले आहे.
डकी बहीण योजनेचे बंद झालेले पैसे पुन्हा सुरू करून देण्याचे आमिष दाखवत काही जणांकडून लाभार्थी महिलांची दिशाभूल केली जात आहे. महा-आयडी कार्ड काढल्यास पैसे सुरू होतील, ई-केवायसी पूर्ण होईल किंवा कार्ड काढले नाही तर योजनेचा लाभ बंद होईल, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार केल्यास पैसे तत्काळ सुरू होतील, असे सांगूनही फसवणुकीचा प्रयत्न केला जात आहे.
प्रयत्न केला जात आहे.
महिलांनी अशा खोट्या भूलथापांना बळी पडू नये. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे देऊ नयेत तसेच बँक खात्याची माहिती, ओटीपी, आधार क्रमांक किंवा इतर गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये. समाज माध्यमे, फोन कॉल किंवा इतर माध्यमातून मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये. योजनेबाबत अडचण किंवा शंका असल्यास अधिकृत यंत्रणेकडून मिळणाऱ्या माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. केले आहे.
राज्य सरकारने जून २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. सुरुवातीला लाभार्थ्यांची संख्या मोठी होती. आधार, ई-केवायसी, उत्पन्न, कुटुंबातील शासकीय कर्मचारी अथवा इतर योजनांचा लाभ तसेच अन्य पात्रता निकषांची पडताळणी केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नावे कमी झाली. अर्ज दाखल केलेल्या एकूण दोन कोटी ४८ लाख लाडक्या बहीणीमधून एप्रिल अखेर पर्यंत सुमारे ९२ लाख नोंदी अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहीणींची लाभार्थी संख्या १.६५ कोटींवर आली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर २५ ऑगस्टपासून जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. ६५ वर्षांची वयोमर्यादा ओलांडलेल्या महिलांना या योजनेचा लाभ सुरू ठेवता येत नाही. त्यामुळे सुमारे ५३ हजार महिलांना जुलैचा हप्ता मिळणार नाही.


