राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पोलीस प्रशासनाला चक्काजाम आंदोलनाचा इशारा
शहरातील विस्कळीत वाहतूक सुरळीत करा – संपत भारस्कर
अहिल्यानगर : शहरातील केडगांव, कायनेटीक चौक, सक्कर बिस्किट कारखाना, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेटबँक चौक, कोटला स्टँड, महानगरपालिका मुख्य कार्यालय, तसेच शहर परिसरातील वाहतुक संपुर्ण पणे विस्कळीत झाली असुन नागरीकांना तासंतास वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रुग्णांना घेऊन जाण्या-या अब्युलेंन्स याला सुधा या वाहतुकिच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊन जिवीत हानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. या वाहतुक कोंडीबाबत नगरकरांमध्ये तिव्र संतापाची लाट निर्माण झाली असुन या वाहतुक समस्येमुळे नागरीक प्रचंड त्रस्त झालेले आहे. या वाहतुक समस्येवर तोडगा निघुन वाहतुक सुरळीत न झाल्यास येत्या गुरुवारी दि.29 रोजी सकाळी 11:00 वा. कोतवाली पोलिस स्टेशन व तोफखाना पोलिस स्टेशनच्या आवारात तसेच उड्डान पुलाजवळ शिल्पा गार्डनच्या समोर तसेच कोटला स्टँड जवळील उड्डान पुला शेजारी एकाच वेळी या सर्व ठिकाणी ठिय्या आंदोलन करून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संपत भारस्कर, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, अजिंक्य बोरकर, सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, राजेश भालेराव, योगेश गलांडे, दीपक खेडकर, राहुल कातोरे, गिरीश जगताप आदी उपस्थित होते.
(चौकट) शहरामध्ये वाहतूक समस्येचा प्रश्न गंभीर बनला असून त्याचा त्रास शहरातील नागरिकांना होत आहे. महिला भगिनी आपल्या दुचाकी गाडीवरून प्रवास करीत असताना त्यांची अतोनात हालवत आहे. तसेच शाळकरी मुले सायकलवरून प्रवास करीत असताना मोठ्या समस्येला सामोरे जात आहे. महामार्गावर ठिकठिकाणी अतिक्रमण असून यामुळे देखील वाहतूक कोंडी होत आहे. तसेच वाहतूक कुंडीमुळे दुर्दैवाने एखाद्या दिवशी मनुष्य हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वाहतूक कुंडीचा प्रश्न पोलीस प्रशासनाने नियोजन करून मार्गी लावावा अशी मागणी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी व्यक्त केली.


