पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रावादी काँग्रेसचे वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार बापू पठारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यामध्ये आमदार पठारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडू खांदवे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पठारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण आणि गळ्यातील चैन चोरल्याचा उल्लेख एफआयएरमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली असून राजकारण तापले आहे.काही दिवसांपूर्वी पठारे यांनी खांदवे यांच्यामध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची झाल्याचे समोर आले होते. आता याप्रकरण आणखी तापले असून खांदवे यांनी पोलिसात धाव घेतली आहे. आमदार पठारे यांच्या विरोधात बंडू खांदवे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार पठारे यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर पठारे यांचा पुतण्या माजी नगरसेवक महेंद्र पठारे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
बंडू खांदवे यांना जबर मारहाण करणे आणि त्याचबरोबर त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेण्याचा गुन्हा आमदार पठारे यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी लोहगाव मध्ये एका कार्यक्रमादरम्यान बापू पठारे आणि बंडू खांदवे यांच्यात वाद झाला होता. या वादात हाणामारी झाली होती. त्यानंतर पठारे यांच्या ड्रायव्हरच्या तक्रारीवरून बंडू खांदवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता बंडू खांदवे यांच्या तक्रारीवरून आमदार पठारे यांचे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आमदार पठारे यांच्यासह त्यांची दोन मुले पुतण्या आणि एकूण नऊ जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत


