कृषी अधिकाऱ्याला शेतकऱ्याकडून लाच घेताना रंगेहाथ पकडलं, एसीबीची मोठी कारवाई!

अंबडच्या उप कृषीअधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. शेतकऱ्याच्या ठिबक सिंचनाच्या अनुदानाचा तपासणी अहवाल पुढे पाठवण्यासाठी १७ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. विश्वनाथ गावित असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत एका शेतकऱ्याने आपल्या शेतात ठिबक सिंचन संच बसवला होता. या संचाची पाहणी आणि तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी पाठवणे अपेक्षित होते. मात्र, हा अहवाल पुढे पाठवण्यासाठी उप कृषीअधिकारी विश्वनाथ गावित यांनी संबंधित शेतकऱ्याकडे १७ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

लाचेची मागणी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारताना अधिकाऱ्याला एसीबीच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईनंतर अंबड पोलीस ठाण्यात विश्वनाथ गावित यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे. शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देताना पैशांची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात एसीबीने केलेल्या या कारवाईमुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी काही बाबी समोर येतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles