सध्या सगळीकडे दिवाळीची जोरदार तयारी सुरु आहे. दिवाळी म्हटले की नवे कपडे खरेदी करणे, घरात नव्या वस्तू घेणे, रोशनाई करणे, फराण बनवणे अशा अनेक गोष्टी आल्या. अनेकजण दिवाळीसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसतात. दरम्यान, आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळी खरेदीवरुन केलेल्या आवाहानामुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी ‘दिवाळीत फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा’ असे विधान केले आहे.सोलापूरमध्ये झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चात आमदार संग्राम जगताप यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी, ‘दिवाळी निमित्ताने बाजारपेठ आहे. सर्वांना विनंती करतो, दिवाळीची खरेदी करताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातील नफा रिटर्न फक्त आणि फक्त हिंदू माणसांनाच झाला पाहिजे. अशा प्रकारची दिवाळी हिंदूंनी साजरी करावी’ असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दिवाळीत फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा; आमदार संग्राम जगताप यांचे विधान
0
39
Related Articles
- Advertisement -


