शिक्षकांना आणखी एक प्रशिक्षण… नोंदणीसाठी २९ एप्रिलपर्यंत मुदत!

राज्यातील शिक्षकांना १२ वर्षे आणि २४ वर्षांच्या सेवेनंतर दिल्या जाणाऱ्या वरिष्ठ आणि निवडश्रेणीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, शिक्षकांना शुल्क भरून ऑनलाइन नोंदणीसाठी २९ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे प्रभारी संचालक डॉ. नंदकुमार बेडसे यांनी या बाबत परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांतील शिक्षकांना १२ वर्षांच्या सेवेनंतर वरिष्ठ श्रेणी आणि २४ वर्षांच्या सेवेनंतर निवडश्रेणी दिली जाते. त्यानुसार वरिष्ठ श्रेणीसाठी ३० एप्रिलपर्यंत १२ वर्षांची, तर निवडश्रेणीसाठी ३० एप्रिलपर्यंत अर्हताकारी सेवा पूर्ण करणे अनिवार्य आहे.
तसेच काही शिक्षक, मुख्याध्यापक १ मे २०२६ ते ३० एप्रिल २०२७ या कालावधीत अर्हताकारी सेवा पूर्ण करून या कालावधीत निवृत्त होणार आहेत. त्यामुळे संबंधित शिक्षक, मुख्याध्यापकांना वरिष्ठ, निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करता येणार आहे. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच कालावधीत प्रत्यक्ष स्वरुपात (ऑफलाइन) हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी स्वतंत्रपणे कळवला जाणार असल्याचे माहिती परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

नोंदणी केलेल्या शिक्षकांचे गटनिहाय प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करताना शालार्थ आयडी वापरून नोंदणी करणे बंधनकारक आहे. प्रशिक्षणार्थ्यांना नोंदणी करताना वापरलेल्या शालार्थ आयडीची पडताळणी करण्यात येणार आहे. पडताळणीमध्ये विभागाने संबंधितांना पात्र न केल्यास त्यांची नोंदणी रद्द केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशिक्षणासाठी २९ एप्रिलपर्यंत मुदत आहे. तसेच नोंदणीसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. नोंदणी करताना निवडलेला प्रशिक्षण गट, प्रशिक्षण प्रकार याची काळजीपूर्वक पडताळणी करूनच नोंदणी अंतिम करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशिक्षणासाठी प्राथमिक गट (पहिली ते चौथी, पहिली ते पाचवी, पहिली ते सातवी, पहिली ते आठवी, सहावी ते आठवी), माध्यमिक गट (नववी ते दहावी), उच्च माध्यमिक गट (अकरावी, बारावी), अध्यापक विद्यालय गट असे चार गट करण्यात आले आहेत. प्रशिक्षण वर्ग मराठीतून होणार आहे. वाचनसाहित्य मराठीव्यतिरिक्त इंग्रजी आणि उर्दू या भाषांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles