गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना दोन दिवसात ई-केवायसी करण्याचे आव्हान

अहिल्यानगर-गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना ई-केवायसी करण्याची मुदत आता अवघे दोन दिवस राहिली आहेत. परंतू ग्राहकांना ई-केवायसी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, एकट्या नगर जिल्ह्यात 2 लाख ग्राहकांनी आतापर्यंत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने अडचणी निर्माण होणार आहेत. जिल्ह्यात एलपीजी सिलिंडरचा पुरवठा करणार्‍या प्रमुख तीन कंपन्या व त्यांचे 12 लाखांवर ग्राहक आहेत. एलपीजी ग्राहकांची अद्ययावत माहिती ठेवण्यासाठी ही प्रक्रिया करणे कंपन्यांनी अनिवार्य केले आहे.

मुदतीत बायोमेट्रिक वा ई-केवायसी पडताळणी न करणार्‍या ग्राहकांना व्यावसायिक दराने सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे. अंतिम मुदतीपर्यंत ई-केवायसी न करणार्‍यांची सबसिडी तात्पुरती स्थगित केली जाईल. प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना घरगुती दराऐवजी बाजारभावाने विकत घ्यावा लागणार आहे.
जिल्ह्यात आजघडीला 12 लाख 83 हजार 401 ग्राहक आहेत. त्यातील 81.30 टक्के ग्राहकांनी ई-केवायसी केली असली तरी अद्यापही 2 लाख 2 हजार 847 ग्राहक एजंसीकडे फिरकलेच नाहीत. परंतु आता शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने ग्राहकांची तारांबळ उडाल्याचे दिसून येत असून गॅस एजंसीवर मोठी गर्दी होणार आहे.

कंपनीनिहाय गॅस ग्राहक आणि केवायसी न झालेले
बीपीसीएल 7,57,215 (97 हजार 888), एचपीसीएल 4,32,302 (82 हजार 361), आयओसीएल 93,948 (22 हजार 623).

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles