संभाजीनगर हादरले! हायकोर्टाच्या वकिलाची निर्घृण हत्या, मध्यरात्री रस्त्यात गाठले अन् सपासप वार

न्यायालयातील वकिलाच्या हत्येनं छत्रपती संभाजीनगर हादरलेय. बीड बायपास रोडवर गांधेली फाट्याजवळ उच्च न्यायालयाच्या वकिलाला गाठले अन् धारधार शस्त्रांनी सपासप वार केले अन् पसार झाले. एमआयडीसी सिडको पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. मिथून भास्कर असे हत्या झालेल्या वकिलाचे नाव आहे. लूटमारीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

छत्रपती संभाजीनगर ​शहरातील बीड बायपास रोडवरील गांधेली फाट्याजवळ बुधवारी रात्री उशिरा उच्च न्यायालयाचे वकील मिथून भास्कर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. प्राथमिक पाहणीत त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याचे दिसून आले. लूटमारीच्या उद्देशाने मिथून यांची हत्या करण्यात आली असावी, असा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वकिलाच्या हत्येने संभाजीनगरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकऱणाचा कसून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली आहे.
मिथुन भास्कर वय ४९, रा. आनंद नगर असे मयत वकिलाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने धाव घेतली. गंभीर जखमी भास्कर यांना तातडीने घाटी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. फॉरेन्सिक टीमला भास्कर यांच्या दुचाकीवर दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या हातांचे ठसे मिळाले आहेत.​ भास्कर यांची दुचाकी आणि त्यातील साहित्य सुरक्षित असल्याने ही घटना केवळ लूटमारीच्या उद्देशाने घडली की यामागे काही नियोजित कट होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles