उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सध्या बारामती पोटनिवडणुकीत व्यग्र आहेत. त्यात प्रचारात आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीतील बडे नेते हे त्या मुख्यमंत्री व्हाव्यात अशी मागणी करत आहेत. मंत्री आदिती तटकरे यांनी तर तीन दिवसांपूर्वीच अशी भावनिक साद घातली आणि आता पवार कुटुंबातील दोन सदस्यांनी या मागणीला दुजोरा दिला आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत का? असा सवाल विचारला जात आहे.लोकांच्या भावना अजून देखील दादांच्या जाण्याने दु:ख मनात आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा आम्हाला वाटत होतं. परंतु झाली नाही म्हणून आम्ही प्रचार करीत आहोत. लोकांच्या समस्या जाणून त्या समस्या सोडवण्यासाठी मी जाणून घेतोय आणि त्या वहिनी पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. रोहित पवार यांनी त्यांचे दौरे आखलेले आहेत आणि आम्ही आमचे दौर्यातून प्रचार करीत आहोत. युगेंद्र पवार, रोहित पवार, पार्थ पवार आणि आम्ही दादांसाठी आणि वहिनी साठी प्रचार करतोय हे आमचं भाग्य आहे, असे अजितदादांचे चिरंजीव जय पवार म्हणाले.
विलीनीकरणावर मी भाष्य करणार नाही ही चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं राज्यासाठी योगदान मोठं होतं यासाठी भारतीय जनता पार्टी मधील नेते प्रचार करत असतील तर ही बाब चांगली आहे. उमेदवार सुनेत्रा पवार यांना दोन लाखापेक्षा जास्त लीड मिळेल. सर्वांना वाटत होतं की दादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, सुनेत्रा वहिनी पवार मुख्यमंत्री ही आशा संपूर्ण करू शकल्या तर सर्वांनाच आनंद होईल, असे मत जय पवार यांनी मांडले.


