देशभरात सध्या कॉकरोच जनता पार्टीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. लोकांनी सुरुवातीला याला गंमत समजलं, पण काही दिवसांतच हा विषय सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला.
गेल्या 15 मे रोजी स्थापन झालेल्या कॉकरोच जनता पार्टीने सोशल मीडियावर धुमाकूळ माजवला असून फक्त आठ दिवसांत कॉकरोच जनता पार्टीचे एक कोटी 18 लाख 70 हजार फॉलोअर्स झाले आहेत. समाज माध्यमाच्या इतिहासात इतक्या कमी वेळात एखाद्या चळवळीने फॉलोअर्सचा मिळवलेला हा सर्वाधिक आकडा आहे. शातील सर्वात अधिक लोकप्रिय असलेला ब्लॉगर ध्रुव राठी यालाही कॉकरोच जनता पार्टीने फॉलोअर्सच्या बाबतीत ओव्हरटेक केलं आहे. केवळ 144 तासांत कॉकरोच जनता पार्टीने 18.5 मिलियन सबस्क्राईबर मिळवले आहेत व हा एक इतिहास आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील अभिजीत दीपके मराठमोळ्या तरुणाने अमेरिकेच्या बोस्टनमध्ये बसून ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाने एक वेबसाईट, इंस्टाग्राम हॅन्डल आणि एक्सचं खातं बनवलं. आणि बघता बघता संपूर्ण देशभर ही कॉकरोच जनता पार्टी अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरली आहे. तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात जर कोणी तरुणांचाच अपमान केला तर काय होतं याचा प्रत्यय एका चळवळीतून आला आहे.दरम्यान, या पक्षाचे संस्थापक अभिजीत भगवानराव दीपके हे मूळचे छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज येथील रहिवासी आहेत. 30 वर्षीय अभिजीत यांनी पुण्यातून ब्रॉडकॉस्ट जर्नलिझमचे शिक्षण पूर्ण केले असून सध्या अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात जनसंपर्क विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. ते पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट म्हणूनही काम करत असून, राजकीय नॅरेटिव्ह तयार करणे, सार्वजनिक संवाद आणि डिजिटल माध्यमांद्वारे मतप्रवाह घडवणे यावर त्यांचा अभ्यास केंद्रित आहे. अभिजीत दीपके यांनी 2020 ते 2023 दरम्यान आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले होते. विशेषतः 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी मीम्सआधारित डिजिटल प्रचारावर काम केले. भाजपच्या ‘देश के गद्दारों को गोली मारो सालों को’ या घोषणेवर प्रत्युत्तर म्हणून ‘देश के गवारों को, स्कूल भेजो सारों को’ हे सोशल मीडिया कॅम्पेन राबवण्यात आले होते. त्या मोहिमेतही अभिजीत यांचा सहभाग होता.
अभिजीत हे असं कसं करू शकला, असा प्रश्न पडतो. तो सहज एक शब्द बोलला. गेला आणि लगेच त्याच्यामागे एवढे सारे लोक उभे राहिले. तो प्रामाणिक मुलगा आहे, असे लोकांनाही वाटत असेल. मला एका मुलीने सांगितलं की काकू अभिजीतला युट्युबवर बघा. त्याने कॉक्रोज पक्ष काढला, असं मला त्या काकूंनी सांगितलं. मी लगेच त्याला कॉल लावला तर तो म्हटला मम्मी मी तुला सविस्तर नंतर बोलेल.मला आनंदही वाटतो आणि दुःखही वाटत आहे. तो गेला तर सुरक्षित राहणार नाही. त्याला कुठून तरी उचलतील. सरकार काय करेल काही सांगता येत नाही, अशा भावना अभिजित दीपकेच्या आई अनिता दीपके यांनी व्यक्त केल्या.


