महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; ३४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत. राज्यातील विविध शहरांतील पोलीस आयुक्तालये, गुन्हे शाखा, राज्य राखीव पोलीस बल तसेच विशेष पथकांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या आदेशामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक ठिकाणच्या पोलीस प्रशासनात मोठे बदल झाले आहेत.

गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, अपर पोलीस आयुक्त नागपूर शहर असलेले शिवाजी राठोड यांची बदली अपर पोलीस आयुक्त ठाणे शहर येथे करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथक, पुणे येथे कार्यरत असलेले प्रवीण ढवळे यांची नियुक्ती अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, नवी मुंबई येथे करण्यात आली आहे. राज्य राखीव पोलीस बलातील विनित साहू यांना पोलिस उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली असून त्यांची नियुक्ती राज्य राखीव पोलीस बल, मुंबई येथे करण्यात आली आहे.

याशिवाय, पोलिस उपमहानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल मुंबई येथे कार्यरत असलेले अशोक दुबे यांची बदली अपर पोलीस आयुक्त, ठाणे शहर येथे करण्यात आली आहे. आर. राजा यांना अपर पोलीस आयुक्त, बिनतारी संदेश, मुंबई या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. दुसऱ्या आदेशात अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस उपआयुक्त ठाणे शहर असलेले शशिकांत बोराटे यांची नियुक्ती पोलिस अधीक्षक, राज्य पोलिस नियंत्रण कक्ष येथे झाली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथील संजीव कदम यांची बदली पोलिस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, पुणे येथे करण्यात आली आहे.

मुंबई शहरातील पोलिस उपआयुक्त विवेक पानसरे यांची बदली पोलिस उपआयुक्त, ठाणे शहर येथे करण्यात आली आहे. तर ठाणे शहरातील अमरसिंग जाधव यांची नियुक्ती पोलिस अधीक्षक, डायल-११२, नवी मुंबई येथे करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलिस उपआयुक्त संजय सरंग पाटील यांची बदली मीरा-भाईंदर वसई-विरार येथे पोलिस उपआयुक्त म्हणून झाली आहे.

मीरा-भाईंदर वसई-विरार येथील विक्रांत देशमुख यांना पिंपरी-चिंचवड येथे पोलिस उपआयुक्त म्हणून नेमण्यात आले आहे. प्रीती टिळे यांची नियुक्ती सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई येथे करण्यात आली आहे. राज्य पोलिस नियंत्रण कक्षातील समीर शेख यांची बदली अपर पोलिस अधीक्षक, बीड येथे करण्यात आली आहे.

मुंबई शहरातील हिमंत जाधव यांची नियुक्ती अपर पोलिस अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी कार्य बल, पुणे येथे करण्यात आली आहे. सारथी सुरक्षा विभागातील रमा चौधरी यांची बदली पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागभीड, दौंड येथे झाली आहे. तसेच विनय राठोड यांची नियुक्ती पोलिस अधीक्षक, ठाणे ग्रामीण येथे करण्यात आली आहे. दरम्यान, काही अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. गृह विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील पोलिस प्रशासनात नव्या जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धतीत बदल होणार असल्याचे मानले जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles