सावता परिषदेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी प्रविण जाधव यांची निवड..
अहिल्यानगर, १३ जुलै २०२५ रोजी सावता परिषदेच्या अहिल्यानगर महानगर जिल्हाध्यक्षपदी प्रविण जाधव यांची संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली आहे. बिड येथे पार पडलेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ही निवड अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. या बैठकीला संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रविण जाधव हे सात वर्षा पासुन संघटना बळकट करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे जिल्हास्तरावर सावता परिषदेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवले जाईल, असा विश्वास प्रदेश प्रभारी मयूर वैद्य , प्रदेश अध्यक्ष गणेश दळवी, प्रधान महासचिव राजीव काळे सर, प्रदेश अध्यक्ष युवक आघाडी प्रवीण गाडेकर, प्रदेश कार्याध्यक्ष संतोष राजगुरु, जिल्हा अध्यक्ष निखिल शेलार आदी मान्यवरांनी व्यक्त केला.
निवडीनंतर प्रवीण जाधव यांचे फुलांचा हार व सत्कार करून मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.
संपूर्ण संघटनेत त्यांच्या निवडीचे स्वागत होत असून पुढील काळात संघटनेच्या विस्ताराला गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


