Wednesday, November 12, 2025

केंद्रपुरस्कृत योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा – खासदार निलेश लंके

केंद्रपुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – खासदार वाकचौरे
योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा – खासदार निलेश लंके
अहिल्यानगर, – सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी समन्वय व सकारात्मक दृष्टीकोनातून प्रभावीपणे करावी, असे निर्देश खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिले. तर योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशीलपणे काम करा, असे आवाहन खासदार निलेश लंके यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केंद्र पुरस्कृत जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण (दिशा) समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानी बोलताना श्री. वाकचौरे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस सहअध्यक्ष खासदार निलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, आयुक्त यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सदस्या सुनीता भांगरे, प्रकल्प संचालक राहुल शेळके आदी उपस्थित होते.
खासदार वाकचौरे म्हणाले, रोजगार हमी योजनेतून बेरोजगारांना शाश्वत रोजगार मिळावा यासाठी निधीचा पुरेपूर वापर करावा. प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे, यासाठी घरकुल योजना अधिक जोमाने राबवावी. महावितरणशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र बैठक घ्यावी. जिल्ह्याला सोलरयुक्त करण्यासाठी सोलर योजनेत गती द्यावी. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कामांची गुणवत्ता चांगली राहावी, याकडे लक्ष द्यावे. अंत्योदय योजनेत लाभार्थ्यांना पुरेसे धान्य व शिधापत्रिका मिळाल्याची खात्री करावी.
योजनांचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करून लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवाव्यात. यासाठी तालुका स्तरावर मेळावेही घ्यावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
खासदार निलेश लंके म्हणाले, कृषी विभागाच्या योजना तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात. ठिबक, स्प्रिंकलर, कांदाचाळ आदींच्या अनुदानाची रक्कम थेट खात्यावर जमा करावी. मागेल त्याला सोलर योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळावा व हयगयी करणाऱ्या एजन्सींवर कारवाई करावी.
ग्रामीण भागातील रोहित्र त्वरित दुरुस्त करून नागरिकांचा त्रास कमी करावा. स्वस्त धान्य दुकानांवरील कारवाई नियमाप्रमाणे व्हावी. पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करावा.
शाळांतील पोषण आहार व रुग्णालयातील सेवा दर्जेदार ठेवाव्यात. महापालिकेची कामे वेळेत पूर्ण करावीत व गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, असे निर्देशही श्री. लंके यांनी दिले.
बैठकीस सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles