अखेर नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांची प्रतीक्षा संपली
आजपासून 50% रकमा थेट खात्यात वर्ग होणार – अवसायक गणेश गायकवाड
नगर : अवसायानात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांची प्रतिक्षा अखेर संपली असून प्रशासनाने यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे पाच लाखांपेक्षा जास्त रकमेची ठेव पावती असलेल्या ठेवीदारांना ठेव पावतीच्या 50% रक्कम थेट ठेवीदारांच्या खात्यात आज पासून वर्ग होणार असल्याची माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली.
डी आय सी जी सी कार्यालयाकडून सदरचे ना हरकत प्रमाणपत्र बँक प्रशासनास प्राप्त झाल्यामुळे पाच लाखांपेक्षा जास्त ठेव रक्कम असलेल्या व विहित नमुन्यातील क्लेम फॉर्म व केवायसी अपडेट केलेल्या 1926 ठेवीदारांना ठेव पावतीच्या 50% इतकी रक्कम आज पासून शाखानिहाय संबंधित ठेवीदारांनी दिलेल्या बँक खात्यात आजपासून जमा करण्यात येणार आहेत.


