Friday, November 14, 2025

…नाहीतर तुझी बायकोला घरी पाठव, बीडमध्ये व्यापार्‍याने केली आत्महत्या, भाजप नेत्याला अटक

बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सावकारी जाचाला कंटाळून एकाने आयुष्य संपवले आहे. एका कापड व्यावसायिकाने आत्महत्या केली आहे. सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केले असल्याचे समजले आहे. धक्कादायक बाब म्हणजे,वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड अशी धमकी सावकाराने त्या व्यापाऱ्याला दिली होती.यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी कपडा व्यावसायिकाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.

बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. राम फटाले यांनी सात वर्षांपूर्वी सावकाराकडून अडीच लाख रुपये दहा टक्के व्याजाने घेतले. याची परतफेड म्हणून 25 हजार रुपये प्रति महिना देत होते. मात्र पैसे देऊन देखील सावकारी जाच कमी होत नव्हता. तुझ्याकडून वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड.. असे म्हणत सावकाराने मानसिक छळ केला. वेळोवेळी होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर राम फटाले यांनी चार पानांची सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली..

दरम्यान या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात सावकार डॉ. लक्ष्मण जाधव आणि त्याच्या पत्नीसह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल असून तिघेजण अटकेत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी एक पथक रवाना केले आहे. यातील मुख्य संशयित आरोपी डॉ.लक्ष्मण जाधव हा भाजपाचा पदाधिकारी आहे.

राम फटाले यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सात सावकारांची नावे लिहिली आहेत यामध्ये भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण जाधव यांच्यासह इतर सहा जणांचा समावेश आहे. या प्रकरणात राम फटाले यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून पेड बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी लक्ष्मण जाधव याला अटक केली.

राम फटाले यांचं डोळ्यात पाणी आणणारं पत्र
प्रिय आई आणि पप्पा
सुजय, गौरी आणि रेणुका

मी चांगला मुलगा, पती आणि वडील होऊ शकत नाही. तरी मला माफ करा. रेणुका तुला माझी जागा घेऊन माझे आई-वडील, सुजय आणि गौरी यांची काळजी घ्यावी लागेल. शाम भाऊ लखन माझे मुले आणि बायको, आई-वडील यांना सांभाळा. मला माफ करा, तुम्हा सर्वांचा राम.

माझे आई-वडील यांच्याकडे माझ्या मातीसाठी पैसे नाहीत. माझी माती समाजाकडून वर्गणी काढून करावी. माझं दहावं, तेरावं आणि चौदावं करु नका. माझं वर्षश्राद्ध करु नका, ही माझी इच्छा आहे. रेणुका मी तुझ्यावर माझ्या परिवाराची जबाबदारी देऊन जात आहे. तुला यापुढे खंबीरपणे सर्वांशी झगडावे लागेल.

तुझा राम

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles