Gold-Price: सोनं झालं स्वस्त, इतक्या रूपयांनी दर घसरले; जाणून घ्या १० ग्रॅमचा दर….

मवारपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ नोंदवली जात होती. पण आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 1,59,640 रूपयांवर आले आहेत. जीएसटी आणि मेकिंग चार्जसह २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १ लाख ८४ हजार ११६ रूपयांच्या आसपास पोहचतेय. कारण, मेकिंग चार्ज जवळपास (१२ टक्के) १९१०० आणि ३ टक्के जीएसटी ५३६४ इतका लागतो. मुंबई, पुण्यापासून ते दिल्ली आणि चेन्नई या शहरांपर्यंत आज सोन्याच्या दरात बदल झाला आहे. पाहूयात कोणत्या शहरात सोन्याची किंमत काय आहे? २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दरही पाहूयात..

एमसीएक्सवर आज जूनचे कॉन्ट्रॅक्ट डिलिव्हरी असलेले सोने ०.२५ टक्क्यांच्या घसरणीसह प्रति १० ग्रॅम १,५९,२०२ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे, एमसीएक्सवर जुलैची कॉन्ट्रॅक्ट डिलिव्हरी असलेली चांदी ०.४३ टक्क्यांनी घसरून प्रति किलो २,७३,६९० रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे.
देशात सोन्याच्या दरात वाढ सुरूच असून २२ मे रोजी सकाळी सर्व प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,६०,२४० रुपयांपर्यंत वाढला. तर मुंबईत एक तोळा सोन्यासाठी १५९९४० रुपये मोजावे लागत आहेत. अमेरिकी बाँड्सवरील उच्च परतावा आणि डॉलरचे बळकटीकरण असूनही, मौल्यवान धातूंमधील नवीन खरेदीने सोन्याच्या देशांतर्गत भावाला आधार दिला. दुसरीकडे चांदीच्या किमती ५,००० रुपयांनी वधारल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles