26 राज्यसभा जागांसाठी निवडणुकीची घोषणा; वाचा निवडणुकीचे वेळापत्रक

राज्यसभेच्या 26 जागांसाठीच्या निवडणुकीचे बिगूल वाजले असून निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या आहेत. 10 राज्यामधील 26 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 18 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. राज्यसभेतून 21 जून ते 19 जुलै 2026 या कालावधीत वेगवेगळ्या तारखांना विद्यमान खासदारांचा कार्यकाळ संपत असल्याने या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. राज्यसभेतील २४ नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंह बिट्टू यांचा समावेश आहे. त्याशिवाय २ जागांवर पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील सुनेत्रा पवार यांच्या जागेचाही समावेश आहे.निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार, 1 जून रोजी अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर 9 जून रोजी अर्ज छाननी केली जाईल, तर 11 जून रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल. त्यानंतर 12 राज्यांतील 2 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles