एकीकडे मध्यपूर्वेतील तणावामुळे इंधन दरवाढ झाली असून नागरिकांच्या खिशावर ताण पडला आहे. अशातच दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव तब्बल २३८० रुपयांनी स्वस्त झाला आहे, तर चांदीचे दर १० हजारांनी घसरली आहे. त्यामुळे ग्राहकांना खरेदी करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे
२४ कॅरेट सोन्याचे दर
१ ग्रॅम: आजचे दर १५,६०६
८ ग्रॅम: आजचे दर १,२४,८४८
१० ग्रॅम: आजचे दर १,५६,०६०
१०० ग्रॅम: आजचे दर १५,६०,६००
२२ कॅरेट सोन्याचे दर
१ ग्रॅम: आजचे दर १४,३०५
८ ग्रॅम: आजचे दर १,१४,४४०
१० ग्रॅम: आजचे दर १,४३,०५०
१०० ग्रॅम: आजचे दर १४,३०,५००
सोन्यासोबतच बाजारात आज चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. चांदीचे दर १०,००० रुपयांनी घसरले असून आज चांदी प्रति किलो २,७५,००० रुपयांना विकली जात आहे.


