Gold-Price: अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ; जाणून घ्या १० ग्रॅमचा दर

साडेतीन मुहूर्तापैकी एक प्रमुख मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयेचा मुहूर्त मानला जातो, या दिवशी केलेली सुवर्ण खरेदी ही शुभ असते, बरकत देणारी असते, अशी अनेकांची श्रद्धा असल्याने आजच्या या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर असलेल्या सुवर्ण खरेदीच्या मुहूर्ताचा अनेक जण लाभ घेत सोने खरेदी करतील.याच पार्श्वभूमीवर आज सराफा बाजारात मोठी गर्दी दिसून येत आहे. जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे यंदा सोने-चांदीच्या किंमती चांगल्याच वधारल्या आहेत. आजही सोने चांदीच्या भावाने अपेक्षापेक्षा जास्त भरारी घेतली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज १९ एप्रिल २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १५५,७८० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १४२,८०० रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २७५,००० रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles