Video:अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ राहुरीत आ.संग्राम जगताप यांची प्रचार फेरी;आ.जगताप म्हणाले….

अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ राहुरीत आ.संग्राम जगताप यांची प्रचार फेरी

राहुरी शहरात विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजप व महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिक वेग येताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थनार्थ अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी राहुरी शहरात भव्य प्रचार फेरी काढत मतदारांशी थेट संवाद साधला.
या प्रचार फेरीदरम्यान शहरातील विविध भागांत जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या गेल्या.

प्रचार फेरीत भाजप व महायुतीचे पदाधिकारी, स्थानिक नेते, तसेच कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. ठिकठिकाणी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले. फेरीदरम्यान घोषणाबाजी, संपर्क मोहीम आणि जनसंपर्काच्या माध्यमातून प्रचाराला अधिक धार देण्यात आली.
राहुरीतील ही प्रचार फेरी महायुतीसाठी उत्साहवर्धक ठरत असून, आगामी निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles