सेनापती बापट पतसंस्थेवर अखेर अवसायक नियुक्त; ठेवीदारांच्या वर्षभराच्या लढ्याला यश

सेनापती बापट पतसंस्थेवर अखेर अवसायक नियुक्त
ठेवीदारांच्या वर्षभराच्या लढ्याला यश; 150-200 कोटींच्या ठेवींचा प्रश्न

माजी विधानसभा उपाध्यक्ष व माजी आमदार विजय औटी संस्थापक असलेल्या सेनापती बापट मल्टीस्टेट पतसंस्थेवर केंद्र सरकारच्या सहकार विभागाने अखेर अवसायक नियुक्त करण्याचा आदेश दिला आहे.

पारनेरचे सहायक निबंधक विशाल दाते यांच्याकडे संस्थेचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. ठेवीदारांच्या वर्षभराच्या आंदोलनाला हे पहिले मोठे यश मानले जात आहे.

प्रकरण काय आहे?
सेनापती बापट संस्थेत सुमारे 150 ते 200 कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. दोन वर्षांपासून ठेवीदारांना ठेवी मिळत नसल्याने संस्थेतील कारभार ठप्प झाला होता. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.

संस्थापक अध्यक्ष विनोद गोळे यांच्या नेतृत्वाखाली ठेवीदारांनी यापूर्वी मोर्चे, आंदोलने आणि उपोषणही केले होते. मंडळाची मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांच्या विविध टीम्सनी सहकार विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

केंद्राच्या आदेशामुळे आता कर्जदारांवर कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे. दरम्यान विजय औटी यांनी राजीनामा दिल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे. ठेवीदारांची एकजूट फोडण्यासाठी विजय औटी व रामदास भोसले यांनी प्रयत्न केल्याचेही सांगण्यात आले.

पुढील नियोजित पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles